Livestock Census : सप्टेंबरपासून २१ वी पशुगणना

येत्या सप्टेंबरपासून २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेला सुरवात होणार आहे. ही पशुगणना चार महिने म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
Livestock Census
Livestock Census sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : येत्या सप्टेंबरपासून २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेला सुरवात होणार आहे. ही पशुगणना चार महिने म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. यंदाची पशुगणना १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली जात आहे. पशुगणनेसाठी प्रगणकांची नेमणूक केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागात १४१६ गावांसाठी १६८ प्रगणक व ३५ पर्यवेक्षक असून शहरी भागासाठी २३१ वॉर्डांसाठी ६८ प्रगणक व १७ पर्यवेक्षक असे एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडून धोरण योजना आखल्या जातात.

निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी, असे आवाहन डॉ. झोड यांनी केले. पाच वर्षांपूर्वी पशुगणना झाली होती. त्यावेळी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरून घेतली होती. आता प्रगणकांना स्वत:चे मोबाइल वापरावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()