Seized Goods : आचारसंहिता काळात २९ कोटींचा मुद्देमाल जप्त...५५ हजार लिटर दारू, तर सहा कोटींहून अधिक रोकड पकडली
Election code of conduct 2024 : आचारसंहिता काळात नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये २९ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६ कोटी २३ लाखांची रोकड, ५५ हजार लिटर दारू आणि १८ कोटींच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर : आचारसंहिता काळात नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवार (ता. १६) पर्यंत २९ कोटी १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, यापैकी रोकड ६ कोटी २३ लाखांची, तर १८ कोटींच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.