छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांना ५३ लाख शेतकऱ्यांना यंदा ५५ हजार ३५८ कोटी रुपयांचे पीक कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
त्यापैकी ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांना ४० हजार २२५ कोटी रुपयांच्या पीककर्जाचा पुरवठा सभासद शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ७३ टक्के एवढे आहे.
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. कर्ज वाटपात राज्यात कोकण विभागाचा प्रथम क्रमांक लागतो. कोकण विभागाने २४५ टक्के उद्दिष्ट पूर्ती केली आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग ८३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ६७, अमरावती ६७, टक्के, नाशिक ५५, नागपूर ५५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले. मराठवाड्याचा विचार केला तर कर्जपुरवठ्यात सर्वात पुढे लातूर जिल्हा आघाडीवर आहे.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्याने कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती पूर्ण केली. तर सर्वात कमी जालना जिल्ह्यात सर्वात कमी उद्दिष्टाच्या तुलनेत कर्जपुरवठा झाल्याची स्थिती आहे.
राज्यातील आकडेवारी (कोटींमध्ये)
विभाग उद्दिष्ट पूर्ती टक्केवारी
कोकण १,७८७ ४,३७१ २४५
नाशिक १४,२५१ ७,९०८ ५५
पुणे १३,२४० १०,९७६ ८३
छत्रपती संभाजीनगर १२,७४६ ८,५६० ६७
अमरावती ८,०४० ५,३८१ ६७
नागपूर ५,२९२ ३,२६६ ५५
मागील वर्षीपर्यंत घेतलेल्या कर्जाचे नूतनीकरण बंद झाले होते. शेतकऱ्यांनी ३ लाखांचे कर्ज मार्चपूर्वी परतफेड केल्यानंतर केंद्र राज्य शासनाचा पूर्ण ७ टक्क्याचा परतावा नवे-जुने केल्यापासून सहा ते बारा महिन्यांत जमा होतो. तरी या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.
— मंगेश केदार, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.