Waluj MIDC Fire : छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ कामगारांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
6 dead massive fire At At gloves factory In  chhatrapati sambhaji nagar
6 dead massive fire At At gloves factory In chhatrapati sambhaji nagar
Updated on

छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये 'सनशाइन इंटरप्राईजेस' कंपनीत रविवारी ही घटना घडली आहे. मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील आहेत.

घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मोठ्या पयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार फॅक्टरीमध्ये आग मध्यरात्री 2.15 मिनीटांनी लागली होती, आता फॅक्टरीतून सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अग्निशमन अधिकारी, मोहन मुंगसे यांनी एएनआयला सांगितलं की, आम्हाला सकाळी २.१५ मिनीटांनी एक कॉल आला होता, जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा संपूर्ण फॅक्टरीला आग लागली होती. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा लोक आतमध्ये अडकले होते, आमच्या अधिकाऱ्यांनी आत जाऊन सहा लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

6 dead massive fire At At gloves factory In  chhatrapati sambhaji nagar
Waluj MIDC Fire : छ. संभाजीनगरात मध्यरात्री हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

यापूर्वी स्थानिकांकडून इमारतीत पाच लोक अडकल्याचा दावा करण्यात येत होता, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग लागल्याच्या घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे, कामगारांनी सांगितलं की जेव्हा आग लागली तेव्हा कंपनी बंद होती. दरम्यान या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

6 dead massive fire At At gloves factory In  chhatrapati sambhaji nagar
Ayodhya Ram Mandir : बाबरी खटल्यातील पक्षकाराने PM मोदींवर उधळली फुलं; पाहा व्हिडीओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.