EV Charging Station: इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेत चार्जिंग स्टेशनसाठी महावितरणची यंत्रणा सरसावली आहे. मराठवाड्यात तब्बल ६४७ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक आणि इंधनाच्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी ३० टक्के ही इलेक्ट्रिक वाहने असणार आहेत.