परभणी : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांपुढे अनेक समस्या कायम आहेत. त्यातच एक दिलासा देणारी बाब म्हणजे परभणी ते परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ७६९ कोटी ९३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीला गती प्राप्त होणार आहे. परंतु परभणी ते छत्रपती संभाजीनगर व पुढे अंकाईपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी होणार हा प्रश्न देखील कायम आहे.
मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांवर दक्षिण मध्य रेल्वे विभाग नेहमीच अन्याय करीत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये रूढ झालेली आहे. या प्रवाशांसाठी पुणे, मुंबई, नागपूर या महाराष्ट्रातील शहरांसह अन्य राज्यातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या रेल्वेची वानवा असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पुणे, मुंबई, नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोच्या घरात आहे. परंतु गाड्यांची संख्या मात्र अतिशय कमी आहे.
मराठवाड्यातून एकट्या पुण्याला जाण्यासाठी तीनशेवर खासगी, सरकारी बस धावतात. तरी देखील या मार्गावर अधिकच्या रेल्वे सोडल्या जात नाहीत, ही एक शोकांतिका आहे. रेल्वे अधिकारी व खासगी बस मालिकांमध्ये साटेलोटे असल्याची चर्चा नेहमीच रंगत असते व रेल्वे विभाग रेल्वे प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही चर्चा खरी तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होते.
परभणी रेल्वे स्थानकाला समस्यांनी घेरले
परभणी रेल्वेस्थानकावरुन दररोज१३२ रेल्वे जा- ये करतात. परंतु येथे प्लॅटफॉर्मची संख्या तीनच असल्यामुळे बहुतांश वेळा अनेक रेल्वे पेडगाव, पिंगळी, सिंगापूर येथे तासनतास थांबवल्या जातात. त्यामुळे स्थानकावर देखील फलाट वाढवण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र तिकीट आरक्षण कार्यालयाची गरज आहे. तसेच नविन इमारतीचे बांधकाम देखील सुरु होणे आवश्यक आहे.
परळी- परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी गेल्या काही वर्षापासून आग्रह धरला होता. त्याला यश आले आहे. मराठवाड्यासाठी महत्त्वाचा असणारा हा रेल्वे मार्ग बाजारपेठेसाठी आणि नागरी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असा रेल्वे मार्ग असून दुहेरीकऱणामुळे परिसरातील विकासाला गती मिळणार आहे.
— खासदार संजय जाधव, परभणी लोकसभा, परभणी.
परभणी-परळी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधी मंजूर झाला ही बाब अतिशय आनंददायी आहे. आता उर्वरित मार्गाचे देखील तातडीने दुहेरीकरण, विद्युतीकरण होणे गरजेचे आहे. तसेच परभणी रेल्वे स्थानकावर देखील अनेक समस्या असून त्याकडे देखील रेल्वे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
— सुरेश नाईकवाडे, मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना, परभणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.