औरंगाबादेत परताव्याचे अमिष दाखवत व्यावसायिकाला ८३ लाखांचा गंडा

विशेष म्हणजे, बंद पडलेल्या बँक खात्याचे चेक देऊन चौघेही पसार झाले आहेत
Aurangabad scam
Aurangabad scamAurangabad scam
Updated on
Summary

विशेष म्हणजे, बंद पडलेल्या बँक खात्याचे चेक देऊन चौघेही पसार झाले आहेत

औरंगाबाद: कॉटन खरेदी-विक्रीच्या व्यावसायिकाला व्याज व परतावा देण्याचे आमिष दाखवत चौघांनी ८३ लाख ६२ हजारांना गंडवले. विशेष म्हणजे, बंद पडलेल्या बँक खात्याचे चेक देऊन चौघेही पसार झाले आहेत. नारायण छगनलाल गाडोदिया, मीना राजेंद्र गाडोदिया, सीमा संतोष गाडोदिया (सर्व रा. खामगाव, जि. बुलढाणा) व विजय रामनिवास गाडोदिया (रा. इंदूर, मध्यप्रदेश) अशी फसवणूक केलेल्या चौघांची नावे आहेत. सुरेश झुंबरलाल गांधी (रा. अष्टविनायक एन्क्लेव्ह, रेल्वे स्टेशन रोड) यांची किसान अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज नावाची जाकमाथा वाडी येथे जिनींग प्रेसींग आहे. या जिनींग प्रेसींग संस्थेचे अण्णासाहेब माने व शरद गांधी हे दोघे भागीदार आहेत. त्यांनी ५ जून २००८ रोजी शासकीय, निमशासकीय व इतर सर्व व्यवहार पाहण्यासाठी नोंदणीकृत मुख्त्यारपत्र दिलेले आहे. तेव्हापासून गांधी हेच संस्थेचा व्यवहार पाहतात. तसेच त्यांची आनंद कॉटजिन प्रा. लि. नावाची गंगापुरातील माहुली येथे जिनींग-प्रेसींग आहे. या जिनींग प्रेसींग संस्थेचे संचालक गांधी व त्यांचा मुलगा अनुप असे दोघे आहेत. ते इतर कंपन्यांकडून कॉटन खरेदी करुन त्याची इतर कंपन्यांना गांधी हे विक्री करतात. हा व्यवसाय दलालांमार्फत केला जातो.

गांधी यांच्या कंपनीचे बऱ्याच वर्षांपासून दलाल अर्पित जैन (रा. इंदूर, मध्यप्रदेश) हे खरेदी-विक्रीचे काम पाहतात. जैन यांनी ऑक्टोबर २०२० च्या पहिल्या आठवडयात गांधींशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना खामगावात एमसीजी स्पिनर्स नावाची कंपनी असून, कंपनीचे संचालक दोन्ही कंपनीकडे विक्रीसाठी असलेले कॉटन यार्न खरेदी करायला तयार आहेत. ही नामांकित संस्था असून, त्यांचे जिनींग, ऑईल मिल, स्पिनिंग मिल आणि प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे उद्योग आहेत. असे सांगितल्याने यार्नच्या क्वॉलिटी व गाडोदियाच्या भावाबाबत गांधींनी चर्चा करुन व्यवहार निश्चित केला. त्यानंतर त्यांनी कंपनीचे नारायण, विजय गाडोदिया व त्यांचे नातेवाईक असे भागीदार असल्याचे सांगितले. कॉटन यार्नच्या संपूर्ण बिलाची रक्कम आठ दिवसात कंपनीच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करु कंपनीची व्याप्ती खूप मोठी आहे. असे सांगत गाडोदिया कुटुंबियांनी गांधींचा विश्वास संपादन केला. त्यामुळे १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात बापोडीतील धनलक्ष्मी कॉटन अ‍ॅन्ड राईस मिल प्रा. लि. व आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील गायत्री कॉटन प्रॉडक्ट या दोन्ही कंपन्यांकडून कॉटन यार्न खरेदी केले.

Aurangabad scam
कोविड हाॅस्पिटलमध्ये मिळेना जेवण, आष्टीत रुग्ण रात्रभर उपाशी

त्यानंतर १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत किसान अ‍ॅग्रो व आनंद कॉटजिन या दोन्ही संस्थेकडून दलाल जैन यांच्यामार्फत १३ क्विंटल कॉटन यार्न एमसीजी स्पिनर्स यांच्या खामगावातील फर्म रिलायबल ट्रेड लिंकला २६ लाख ५६ हजार ७७६ रुपयात विकला. या बिलाची रक्कम गाडोदियाने २३ ऑक्टोबर रोजी बँक खात्यात जमा केली. त्यामुळे गांधी यांचा गाडोदियावर आणखीनच विश्वास बसला. त्यानंतर दोन्ही संस्थेकडून वेळोवेळी एमसीजी स्पिनर्स या कंपनीला पाठविलेल्या कॉटन यार्नच्या मालाच्या एकुण सात बिलांपैकी चार बिलांची रक्कम दोन्ही संस्थेच्या बँक खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात आले. परंतु उर्वरीत दोन्ही संस्थेची उर्वरीत तीन बिलांची रक्कम ७४ लाख ६५ हजार ८५३ रुपये याबाबत गाडोदिया यांना वेळोवेळी विनंती करण्यात आली. पण त्यांनी सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगून वेळ काढूपणा केला. त्यानंतर नारायण गाडोदिया यांनी दोन्ही संस्थेचे ७४ लाख ६५ हजार ८५३ रुपये ताबडतोब देण्यास असमर्थता दर्शवली.

दीड महिन्यांची मागितली मुदत-
संस्थेची उर्वरीत मूळ रक्कम ४६ लाख ६८ हजार १८५ रुपये व रकमेच्या ठेवीवर दोन टक्के प्रती महिना याप्रमाणे व्याजासह एकूण रक्कम ५२ लाख २८ हजार ३६७ रुपयांचे दिड महिना मुदतीचे किसान अ‍ॅग्रो इंडस्ट्री या नावाने खामगावातील बँक खात्यात एमसीजी स्पिनर्स या कंपनीचे तीन चेक ३० एप्रिल रोजी वटणवण्याठी दिले. आनंद कॉटजिन प्रा. लि. या संस्थेची बाकी असलेली मुळ रक्कम २७ लाख ९७ हजा ६६८ रुपये या रकमेच्या ठेवीवर प्रती महिना दोन टक्के अशी व्याजासह एकुण ३१ लाख ३३ हजार ३९० रुपयांचे दिड महिना मुदतीचे चेक देण्यात आले. मात्र, ते बंद खात्याचे असल्याचे निष्पन्न झाले.

Aurangabad scam
सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले, धरण शंभर टक्के भरले

आर्थिक गुन्हे शाखेत धाव
गाडोदिया कुटुंबातील चौघांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच गांधी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे, जमादार गोकुळ वाघ, पोलिस नाईक सुनील फेपाळे, नितीश घोडके यांनी पुरावे हस्तगत करुन चौघांविरुध्द गांधी यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()