छत्रपती संभाजीनगर : घरात तान्हुले बाळ आहे. इथे फटाके उडवू नका, असे म्हटल्याने शेजारी असलेल्या दोन कुटुंबात वाद झालेला वाद पोलिस ठाण्यात मिटला. मात्र, घरातील पुरूष मंडळी आल्यावर पुन्हा वाद चिघळला. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यात फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या कुटुंबातील एजाज गणी शेख (३३ रा. हिनानगर) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.