Accidental Death: 'त्या' अपघातातील जखमी  महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू!
Accidental

Accidental Death: 'त्या' अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू!

Marathawada newsNews | नामदेव कारभारी डफाळ हे नाशिक येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
Published on

Bidkin: दि.०५ रोजी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील रेणुका माता मंदिर कमानी जवळ,ताहेरपुर येथे दोन दुचाकींचा समोरासमोर धडक झाल्याने दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले होते.या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.

ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष वेदपाठक यांनी प्रथमोपचार करत शासकीय रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले होते.आज दि.०६ रोजी सकाळी ०९:३० वाजता अपघातातील

Accidental Death: 'त्या' अपघातातील जखमी  महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू!
Dhule-Solapur Highway Accident: धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

गंभीर जखमी महिला नंदाबाई लहु पाखरे,वय.५० वर्षे.रा.गुंतेगाव.ता‌.गेवराई.जिल्हा बीड यांचा आज सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.ताहेरपुर परिसरातील अपघाताची घटना परिसरात कळताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यातील मयत दुचाकीस्वार नामदेव कारभारी डफाळ,वय.२८ वर्षे,रा.रोहतवाडी,ता.पाटोदा .जि बीड आणि अशोक कडुबा भालेराव, वय ३२ वर्षे,रा.मिसारवाडी.ता.छत्रपती संभाजीनगर यांच्यावर काल रात्री ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते तर आज दोघांवर हि अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.या अपघात ग्रस्तांच्या विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अपघातातील अनिता नामदेव डफाळ ह्या जिल्हा शल्यचिकित्सक येथे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत.तर नामदेव कारभारी डफाळ हे नाशिक येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

Accidental Death: 'त्या' अपघातातील जखमी  महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू!
Marathi Actress Mother's Death: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मातृशोक; आईच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते-

अशोक कडुबा भालेराव हे बांधकाम कामगार‌ म्हणून मोलमजुरी करायचे तर नंदाबाई लहु पाखरे ह्या मोलमजुरी करत असायच्या अशी माहिती दोन्ही अपघात ग्रस्तांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे.सदरिल घटनेची बिडकिन पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढिल तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक माने व पोलिस कर्मचारी संदिप धनेधर यांच्या वतीने करण्यात येत आहे ‌

Accidental Death: 'त्या' अपघातातील जखमी  महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू!
Accident Death : येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात चारचाकीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.