WhatsApp Library : आम्ही सारे ‘व्यसनी’च; पण वाचनाचे; युवकाच्या संकल्पनेतून थाटले व्हॉट्सॲप ग्रंथालय; राज्यभरात विस्तार

तरुणाई सक्षम करण्यासाठी २०१८ मध्ये ‘व्हॉट्सॲप’ ग्रंथालय थाटले. राज्यभरातील ग्रुपला नावही ‘ग्रंथालय’ असेच देण्यात आले
WhatsApp Library
WhatsApp Librarysakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ‘आजची युवा पिढी वाचतच नाही, मोबाइलवर व्यग्र राहून स्वतःचे आयुष्य वाया घालवते,’ अशी ओरड होत आहे. या युवा पिढीला मोबाइलवरच ‘वाचनाचे व्यसन’ लावण्याचा कृतिशील संकल्प एका तरुणाने केला अन्‌ त्यासाठी त्याने ‘व्हॉट्सॲप ग्रंथालय’ देखील थाटले.

संबंधितांना मागणीप्रमाणे पुस्तके, शासन निर्णय, कादंबरी आदी डेटा ‘पीडीएफ’ स्वरूपात या ग्रंथालयातून मोफत दिला जातो. त्यासाठी तब्बल ८ हजार पीडीएफ फाइल संग्रहित करण्यात आल्या आहेत. या ग्रंथालयाचा विस्तार राज्यभर झाला आहे. व्यसनाधीनतेकडे झुकत असलेल्या युवा पिढीला वाचनाचे व्यसन लावून वाचन संस्कृती वाढविण्याची संकल्पना धुळ्यातील आकाश कापुरे यांच्या मनात आली. त्यांनी ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी, तरुणाईला वेड लावणाऱ्या सोशल मीडियाचाच वापर केला.

WhatsApp Library
Chh. Sambhaji Nagar : चौकशीचे अधिकार असताना प्रकरण पोलिसांत गेले कसे?

तरुणाई सक्षम करण्यासाठी २०१८ मध्ये ‘व्हॉट्सॲप’ ग्रंथालय थाटले. राज्यभरातील ग्रुपला नावही ‘ग्रंथालय’ असेच देण्यात आले. त्याचा विशिष्ट असा लोगो तयार करण्यात आला. आठ व्हॉट्सॲप आणि एक टेलिग्रामचा ग्रुप असून ज्यात राज्यभरातील युवक, तरुण सदस्यांचा समावेश आहे. या माध्यमातून गरजवंतांना पुस्तके, कादंबरी,

स्पर्धा परीक्षांसाठी लागणारा डेटा, शासन निर्णय, कायदे, रामायण, महाभारत, आंबेडकरी साहित्य, गर्भसंस्कार, शेअर मार्केट आदी माहितीसंबंधीची पुस्तके मागणीप्रमाणे पीडीएफ स्वरूपात मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. आजवर हजारो युवकांनी याचा लाभ घेतला आहे.

WhatsApp Library
Mumbai : ब्लॉकचा आज शेवटचा दिवस ! आज ११० लोकल असणार रद्द !

युवकांनी व्यसनापासून दूर जात, वाचनाच्या माध्यमातून सक्षम व्हावे. यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षांचे पेपर, शासकीय, खासगी क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती आदी माहितीही पुरवतो. हे करत असताना कॉपीराइट ॲक्टचा भंग होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते.

-अमोल बोर्डे, कोअर कमिटी सदस्य, व्हॉट्सॲप ग्रंथालय

कोअर कमिटीमार्फत काम

हे ‘व्हॉट्सॲप ग्रंथालय’ यशस्वीरीत्या चालविण्यासाठी विविध क्षेत्रांतील राज्यभरातील नऊ सदस्यांची एक कोअर कमिटी आहे. त्यात धुळ्याचे आकाश कापुरे, यवतमाळचे अनुप उघडे, कोल्हापूरचे प्राध्यापक जयसिंग ओव्हळ, अकोला येथील शिक्षक धम्मदीप इंगळे, नांदेड येथील संतोष गायकवाड, फलटण येथील सनी काकडे, मुंबईतील बुद्धभूषण गवई, शिक्षक सिद्धार्थ सोनकांबळे, छत्रपती संभाजीनगर येथील अमोल बोर्डे आदींचा समावेश आहे.

WhatsApp Library
Nagpur News : कोळसा व्यापाऱ्यावर प्राप्तिकर विभागाचा छापा; संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे, दागिने जप्त

१७ हजार शासन निर्णयाचा संग्रह

विविध विषयांमध्ये ‘पीएचडी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांनीदेखील या ग्रंथालयाच्या माध्यमातून आवश्यक साहित्य मिळविले. पुढे त्याद्वारे संशोधन करून संबंधितांनी ‘पीएचडी’ मिळविल्याचे अनुभव आहेत. सनी काकडे या कोअर कमिटी सदस्याकडे तर तब्बल १७ हजार शासन निर्णयांचे कलेक्शन असल्याचे कोअर कमिटीकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()