औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी कुणालाही न जुमानता आपली दुकानदारी सुरूच ठेवलेली आहे. याची सतत ओरड होत असतानाही मूग गिळून गप्प बसलेल्या प्रशासनाला आता जाग आली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर एका शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश काढून त्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील ८०२ स्वस्त धान्य दुकानांपैकी १९९ महापालिकेच्या हद्दीत आहेत. यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी कृषी सहायक आणि मंडळाधिकारी यांचा यात समावेश करून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोचवावे आणि कोणीही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. गावामध्ये धान्य प्राप्त झाल्यानंतर गावात दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांच्या आणि लाभार्थ्यांच्या निदर्शनास आणावे, लाभार्थ्यांच्या याद्या या स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात.
गावात धान्य प्राप्त झाल्यानंतर याची माहिती सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांना देण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यापूर्वी नियमित कार्यरत असणाऱ्या तीन योजना अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना आणि एपीएल शेतकरी योजना या व्यतिरिक्त इतर दोन योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये मोफत तांदूळ देण्यात येत आहेत.
हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..
मोफत तांदूळ हे फक्त अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना देतात. एपीएल शेतकरी यांना मोफत तांदूळ देण्यात येत नाहीत. तसेच जे केशरी कार्डधारक आहेत ज्यांचा समावेश प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी याच्यामध्ये नाही आणि ज्यांना नेहमी धान्य प्राप्त होत नाही अशा लाभार्थ्यांना सुद्धा मे महिन्यामध्ये धान्य मिळणार आहे.
हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान
सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचे सर्व योजनांचे धान्य अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना येथील शेतकरी योजना आणि मोफत तांदूळ सर्व दुकानांमध्ये पोचलेला असून, ९० टक्के लाभार्थ्यांपर्यंत त्याचे वाटप झाले आहे. आजही स्वस्त धान्य दुकानांतून उर्वरित लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येत आहे. कार्डधारकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाभर विविध पथके स्थापन करण्यात आलेली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.