AIMIM Chief Asaduddin Owaisi : आम्हाला उद्ध्वस्त करणाऱ्याना जागा दाखवा : असदुद्दीन ओवेसी

AIMIM Chief Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कॉन्फरन्समध्ये मुस्लीम समाजाने आपल्या हक्कांसाठी उभे राहावे व त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्यांना जागा दाखवावी, असे आवाहन केले.
AIMIM Chief Asaduddin Owaisi
AIMIM Chief Asaduddin Owaisi sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : यहा वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. सत्तेत आल्यापासून तीन तलाक, युएपीए, सीएए कायदा बनवला, लवकरच जातीनिहाय जनगणनेसोबत एनआरसी, एनपीआरसारखे कायदे आणू शकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वक्फ विधेयकात दुरुस्ती करुन वक्फच्या जमिनी हडप करण्याचा व मुस्लिमांना उद्धवस्त करण्याचा त्यांचा डाव आहे.

येणाऱ्या विधानसभेत आम्हाला उध्दवस्त करण्यासाठी येणाऱ्यांना उध्दवस्त करा, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन वक्फ विधेयकाविरोधात झालेल्या तहाफुज-ए-औकाफ कॉन्फरन्समध्ये खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केले.येथे सोमवारी हज हाऊस येथे वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी उलेमा, मौलाना व कायदेतज्ञ्जांच्या उपस्थितीत कॉन्फरन्स पार पडली. ओवेसी म्हणाले, की वक्फच्या जमिनी सरकारने नाही दिल्या. त्या जमिनी मुस्लिमांनी दान केल्या. (वक्फ) त्या जमिनी नेहरू किंवा मोदींनी नाही दिल्या. पूर्ण देशात वक्फ बिलाविरोधात राग आहे. यातून मुस्लिमांची मालमत्ता हिसकावण्याचा प्रयत्न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.