छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख रस्त्यावरील धूळ उचलण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून यंत्र खरेदी केले. असे असताना शहराच्या मुख्य रस्त्यांवर सर्वत्र धूळच धूळ आहे. त्याचा फटका रविवारी (ता. सहा) शहरात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला.
धुळीचा त्रास झाल्यानंतर पवार यांनी स्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सोमवारी (ता. सात) झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी मुख्य रस्त्यांची नियमित साफसफाई करा, मशीनद्वारे माती काढून घ्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपींचे दौरे असताना विशेष काळजी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
जालना रोडवर त्यांना ठिकठिकाणी पडलेला कचरा व धूळ दिसून आली. रस्त्यावरील धूळ पाहून पवार यांनी शहरासाठी कोट्यवधींचा निधी देऊनही शहर स्वच्छ ठेवता येत नाही का, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत घनकचरा व्यवस्थापनप्रमुख व सहायक आयुक्तांना मुख्य रस्त्यांची विशेषत: जालना रोडची साफसफाई करा, रस्त्याच्या बाजूला साचलेली माती काढा, रस्ते धुऊन घ्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा दौरा असेल त्यापूर्वी विशेष काळजी घ्या, अशा सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.