Dengue Fever
Dengue FeverSakal

डेंगीचा डंख टाळण्यासाठी अलर्ट, ‘चांदीपुरा’च्या धर्तीवर रक्ताचे नमुने पालिका पाठविणार एनआयईकडे

Dengue Fever: गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा व्हायरसमुळे मुलांचा मृत्यू होत आहे, तर पुण्यात झिकाची साथ पसरली आहे. त्यामुळे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत.
Published on

Dengue Fever Alert: छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या चार दिवसांत डेंगीसदृश तापेने दोन मुलांचा मृत्यू झाला. रोशनगेट भागात १३ वर्षीय मुलीचा तर आरेफ कॉलनी भागात गुरुवारी (ता. १८) दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. यातील दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू डेंगी संशयित असला तरी १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू व्हायरलमुळे झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर दाट लोकवस्ती असलेल्या भागातील नागरिकांच्या रक्ताचे सहा नमुने पुण्याच्या एनआयई प्रयोगशाळेकडे पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा व्हायरसमुळे मुलांचा मृत्यू होत आहे, तर पुण्यात झिकाची साथ पसरली आहे. त्यामुळे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत.

महापालिकेने शहरात जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या अनुषंगाने घरोघरी जाऊन ॲबेटिंग करणे, फवारणी, डास आळ्यांचे निर्मूलन, नागरिकांमध्ये जनजागृती, पावसाच्या पाण्याचे ज्या ठिकाणी डबके साचले आहे, तिथे वाहनातील जळालेले ऑइल टाकले जात आहे. असे असतानाच गेल्या चार दिवसांत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले, १३ वर्षीय मुलीचा मृत्यू हा व्हायरलमुळे झाला होता तर १० वर्षांच्या मुलाचा डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे महापालिकेने या भागासह दाट लोकवस्तीतील नागरिकांचे रक्ताचे नमुने पुणे येथील एनआयई (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) प्रयोगशाळेला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Dengue Fever
Monsoon Care Tips: पावसाळ्यात वाढू शकतो 'लेप्टोस्पायरोसिस’ चा धोका, वेळीच व्हा सावध

रक्ताचे नमुने घेतले जात असून, एनआयईच्या अहवालानंतर एखादी साथ आहे का? हे लक्षात येईल. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसची साथ सुरू आहे. पुण्यात झिकाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच डेंगीच्या या पार्श्‍वभूमीवर सहा जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

काय आहे चांदीपुरा व्हायरस

चांदीपुरा व्हायरसने गुजरातमध्ये मुलांचा मृत्यू होत आहे. सँडफ्लाय माशी चावल्याने पसरणारा हा मेंदूज्वर असून, रुग्णाचा २४ ते ४८ तासांत मृत्यू होतो. पावसाळ्यातील दमट वातावरणात हा व्हायरस जास्त पसरतो. वर्ष १९६५ मध्ये हा व्हायरस नागपूर परिसरातील चांदीपुरा या भागात रुग्‍णांच्‍या रक्‍तजल नमुने सर्वेक्षणात आढळून आला. त्‍यावरून त्‍याचे नाव चांदीपुरा ठेवण्‍यात आले. सँडफ्लाय ही माशी डासापेक्षा लहान असून, तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.