जाधववाडी : जळगाव रोडवरील सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट दुभाजकांमध्ये लावलेले चिंच, वड आणि प्रकार असे सुमारे ५०० झाडे महापालिकेनेच काढून फेकली, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. याविरोधात जाधववाडी चौकात रविवारी (ता. १३) निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या झाडांना श्रद्धांजलीही वाहिली.
सिमेंटचे रस्ते उन्हाळ्यात तापतात. दुभाजकामधील झाडांमुळे रस्त्यावर सावली पडून तापमानात नियंत्रित राहील, यासाठी काही दिवसांपूर्वी वी फॉर एन्व्हायर्न्मेंट संस्थेने टीव्ही सेंटर ते हर्सूल रस्त्यावरील दुभाजकामध्ये विविध प्रकारच्या ५०० झाडांची लागवड केली होती. पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही झाडे तोडून फेकून दिल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
यावर ही झाडे दुभाजकात न लावता, खुल्या जागा व रस्त्याच्याकडेने लावावी, असे आवाहन महापालिकेने केले होते. शिवाय चुकीच्या ठिकाणी लावलेली झाडे काढून आम्ही योग्य ठिकाणी लावत असल्याचेही संस्थेला सांगितले.
यानंतर संस्थेचे सचिव कमलकुमार पहाडे यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी महापालिकेने झाडे तोडल्याच्या निषेधार्थ जाधववाडी चौकात निषेध आंदोलन केले. महापालिकेने काढलेल्या झाडांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी मेघना बडजाते, व्यकंटेश देशपांडे, सर्जेराव वाघ, मुरलीधर थोरात, संभाजी मुळे यांची उपस्थिती होती.
आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यावेळी वाघ म्हणाले, आम्ही न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत. यासह मंगळवारी (ता. १५) महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदनही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.