औरंगाबाद: शहरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशात सोमवारी शहरातील निर्बंधे वाढण्याची अफवा पसरली होती. यामुळे आज शहरातील अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले. निर्बंधे वाढून दुकाने बंद होतील या धास्तीने नागरिकांची खरेदीसाठी मोठी झुंबड दिसली. त्यामुळे औरंगाबादमध्ये आज बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले होते. वाढलेले ट्रॅफिक पाहून शिवसेना नेते अंबादास दानवे (ambadas danve) पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसले.
वाढते ट्रॅफिक पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या वेळी वाहतुक सुरळीत करण्यासाठी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे स्वतः रस्त्यावर उतरले होते. दानवे क्रांती चौकात जाऊन वाहनांना वाट करून देत होते. अशातच सर्व नियम तोडून एक रिक्षाचालक विरुद्ध दिशेने आला. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षा चालकाला दानवेंनी नियम तोडल्याने चांगलाच चोप दिला. याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
औरंगाबादमधील क्रांती चौकात अनेक मुख्य रस्ते येत असल्याने तिथं मोठी गर्दी होत असते. दानवे रिक्षाचालकाला चोप देताना पोलिसही तिथेच होते. आज शहरात चार नंतर सगळी दुकाने बंद होतील या भीतीने औरंगाबादकरांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.
लोकांनी चार वाजता मार्केट बंद होईल म्हणून मोठी गर्दी केली आहे. प्रत्येकांनी संयम बाळगून ट्रॅफिक व्यवस्थित करण्यास मदत केली पाहिजे. मी ज्या व्यक्तीला मारले तो माझ्या ओळखीचा व्यक्ती आहे. नियम तोडल्याने मी त्याचावर रागावलो होतो आणि नंतर त्याला समजावून सांगितले. आजची वाढती गर्दी पाहून माझ्यातील शिवसैनिक जागा झाल्याने मी पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलो होतो.
- अंबादास दानवे, आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.