Chhatrapati Sambhajinagar : अंगणवाडी सेविका भरतीत राजकीय घुसखोरी; प्रशासनाला दोनशेहून अधिक तक्रारींचे अर्ज प्राप्त

अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेतली जाते.
anganwadi recruitment political interference 200 complaint chhatrapati sambhajinagar
anganwadi recruitment political interference 200 complaint chhatrapati sambhajinagarSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेतली जाते. जिल्ह्यातील १४ प्रकल्पांत ३ हजार ४२३ अंगणवाड्या असून त्यात मुख्य अंगणवाड्यांची संख्या २,६४२; तर मिनी अंगणवाड्या ७८१ आहेत.

या अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या १७९; तर मदतनीसांची ५८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असली तरी यामध्ये राजकीय हस्तक्षेप देखील वाढला आहे. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण,

स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४ प्रकल्पांत ३४२४ अंगणवाड्या आहेत.

त्यामध्ये मोठ्या अंगणवाडीत २,६४२ पैकी २,४६९ पदावर अंगणवाडी सेविका कार्यरत असून १७३ जागा रिक्त आहेत. तर मिनी अंगणवाडीच्‍या ७८१ पैकी ७७५ जागांवर अंगणवाडी सेविका कार्यरत असून ६ पदे रिक्त आहे.

तसेच या अंगणवाड्यांमध्ये ५८ मदतनीसांच्या जागा अद्याप रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे शासनामार्फत महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्रक्रिया वादात अडकण्याची शक्यता

गावागावांतील रिक्त जागा आणि भरतीच्या जागांची माहिती जास्तीतजास्त महिलांपर्यंत पोचविण्याच्या प्रशासकांच्या सूचना आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीसांची सर्व भरती प्रक्रिया प्रकल्पस्तरावर राबविली जात आहे.

त्यामुळे पारदर्शकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अंगणवाडी भरतीत राजकीय हस्तक्षेपाच्या नेहमीच चर्चा झालेल्या आहेत. आता पदाधिकारी नसले, तरी गावातील स्थानिक राजकारणी शिफारस करत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत दोनशेहून अधिक तक्रारीचे अर्ज महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झाले आहेत. असाच हस्तक्षेप होऊ लागल्यास ही प्रक्रिया वादात अडकण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे

पदभरतीसाठी नियम व अटी

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी सेविकांसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित महिला स्थानिक असावी, वयोमर्यादा १८ ते ३५ पर्यंत असावी, जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत, भाषेचे ज्ञान असावे.

तसेच भरती प्रक्रियेत सहभागी महिला बारावी उत्तीर्ण असेल तर टक्केवारीनुसार ४० ते ६० पर्यंत गुण दिले जातात. पदवीधर असेल तर दोन ते पाच गुणांची आणखी भर पडेल. याशिवाय विधवा १०, अनुसूचित जाती जमाती १०, ओबीसी पाच, अंगणवाडीतील दोन वर्षांचा अनुभव असल्यास पाच गुण, अशाप्रकारे गुणवत्ता यादीत तयार केली जाणार आहे.

रिक्त जागांचा तपशील

प्रकल्प - अंगणवाडी सेविका - मदतनीस

छत्रपती संभाजीनगर १ - ८ - ४

छत्रपती संभाजीनगर २ - १० - ०

पैठण १ - २१ - २

पैठण २ - २८ - ७

गंगापूर १ - ५ - ४

गंगापूर २ - ८ - २

कन्नड १ -५ -१०

कन्नड २ - १०- ०

सिल्लोड १ - ८ - ३

सिल्लोड २ - ८ - १

वैजापूर - ३५ - १४

खुलताबाद - ८ - १०

फुलंब्री - १२ -१

सोयगाव- १३ - ०

एकूण - १७९ -५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.