सातारा परिसर : सोन्या-चांदीच्या दागिन्याचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवत ११ लाख ६४ हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी (ता. १९) रात्री सव्वादहा वाजता चौधरी हेरीटेज, रेणुका माता मंदिर, सातारा परिसरात घडला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला.