Sambhaji Nagar News : थकीत कराचे कारण...थांबले मोफत दळण

जोगेश्‍वरी गट ग्रामपंचायतीत सुरू होती सुविधा :" पाच वर्षांतच बंद
जोगेश्‍वरी गट ग्रामपंचाय
जोगेश्‍वरी गट ग्रामपंचायsakal
Updated on

वाळूज : आदर्श ग्राम पाटोदानंतर वाळूज परिसरातील जोगेश्वरी गट ग्रामपंचायतीने नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी मोफत दळणाची सुविधा सुरू केली होती. मात्र, आता ही योजना गुंडाळून ठेवल्याने ग्रामस्थांची मोठी पंचाईत होत आहे. अवघ्या पाच वर्षांत योजनेचा गाशा गुंडाळावा लागल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ग्रामस्थांनी करभरणा केल्यास ही योजना पुन्हा एकदा सुरू करून मसाल्याचे पदार्थही मोफत दळून देण्याची तयारी ग्रामपंचायत प्रशासनाने दाखवली आहे.

गंगापूर तालुक्यात सर्वात श्रीमंत म्हणून वाळूज महानगर परिसरात जोगेश्वरी गट ग्रामपंचायतीकडे बघितले जाते. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रामराई, कमलापूर, रामराईवाडी, नायगाव व जोगेश्वरी ही गावे येतात. या ग्रामपंचायतीने २०११मध्ये आयएसओ-२००८ मानांकन मिळविलेले आहे. तसेच ग्रामपंचायतीने औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेऊन ते ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय या ग्रामपंचायतीच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात.

का गुंडाळली योजना?

ग्रामपंचायतीचा कर भरण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने योजनेचा उदय झाला. प्रारंभी योजनेला प्रतिसाद मिळाला. दोन गावांमध्ये हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याने योजनेकडे ग्रामस्थांनी पाठ फिरविली. त्यामुळे योजना गुंडाळावी लागली.

साजरे केले ज्येष्ठांचे वाढदिवस

ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांमधील ज्येष्ठ नागरिकांकडे ग्रामपंचायतीकडून मोठ्या आदराने पाहिले जाते. या गावांमधील साठ वर्षांपुढील ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्यावतीने वाढदिवस साजरा केला जातो. महिला ग्रामस्थांना साडीचोळी देवून यथोचित सन्मान करण्यात येतो. २०११पासून ग्रामपंचायतीचा हा उपक्रम सुरू आहे. तसेच ग्रामपंचायतीने आपल्या गावांमध्ये मोफत पिठाची गिरणीचा उपक्रम सुरू केला. तत्कालीन सरपंच योगेश दळवी यांच्या काळात कमलापूर, जोगेश्वरी व नायगाव येथे ही योजना सुरू करण्यात आली होती. जे ग्रामस्थ वर्षभराचा कर ग्रामपंचायतीकडे भरतील, अशांना मोफत दळण दळून देण्याची ही सुविधा होती.

सुरवाताली ग्रामस्थांनी योजनेला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सध्या दृष्ट लागावी, अशा पध्दतीने उपक्रम थांबला. ग्रामस्थ कर भरत असतील तर पुन्हा उपक्रम सुरू करू.

योगेश दळवी, माजी सरपंच, जोगेश्वरी ग्रामपंचायत.

हा उपक्रम लोकोपयोगी आहे, तेवढाच ग्रामपंचायतीला कर वसुलीसाठी फायद्याचाही आहे. त्यामुळे, सर्व गावांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. त्यात दळणासह मसाले, डाळीही दळून दिल्या जातील. मात्र, आपल्याकडील कर भरुन सहकार्य करावे.

- योगिता रामेश्वर आरगडे, सरपंच, जोगेश्वरी ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.