Sambhaji Nagar : पाच लाख लाभार्थी धान्यापासून वंचित

रेशन दुकानदारांच्या आंदोलनाचा जिल्‍ह्यात परिणाम, काढणार मोर्चा
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : रेशन दुकानदारांच्या संपामुळे जिल्ह्यात विविध योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी अन्न-धान्यापासून वंचित आहेत. विविध मागण्यांसाठी देशभरातील रेशन दुकानदारांनी १ डिसेंबरपासून संप सुरू केला. शासनाने १५ जानेवारीपर्यंत दखल न घेतल्याने आता दुसऱ्या टप्प्यात दिल्लीत मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्य अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कमिशनमध्ये वाढ करावी, यासह इतर मागण्यांसाठी देशभरातील ५ लाख ४८ हजार रेशन दुकानदार, राज्यातील ५३ हजार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,८०० दुकानदार यात सहभागी झाले आहेत. पाठपुरावा करूनही केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. संघटनेला चर्चेसाठी निमंत्रणही दिले नाही. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचा भाग म्हणून १० जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. १५ जानेवारीनंतर दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला सुखदेव कदम, गंगाधर पवार, अनिल जाधव, मधुकर चव्हाण, तात्याराव मगरे, सुभाष चौधरी, छबू कांबळे, ललित पाटील, यशवंत काळे, रफिक पठाण आदींची उपस्थिती होती.

अशा आहेत मागण्या

  • महागाईनुसार प्रतिक्विंटल कमिशन तीनशे रुपये करावे

  • नवीन फोर-जी ई-पॉस मशीन लवकर देण्यात याव्यात

  • ऑनलाइन सुधारित कार्यपद्धती विकसित करावी

  • मंजुरी व त्याचे व्यवस्थापनाचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे

  • धान्य वितरण मार्जिनची रक्कम दरमहा ५ तारखेच्या आत द्या

  • आनंदाचा शिधामध्ये पामऐवजी सूर्यफूल किंवा सोयाबीन तेल द्या

  • भारत ब्रॅंड अंतर्गतची उत्पादने विक्रीची परवानगी देण्यात यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.