डॉक्टरच नाहीत मग रूग्णांना कोंबून ठेवायचं का? दानवेंचा सवाल

लोकप्रतिनिधिच जर या परिस्थितिला गांभीर्याने घेत नसतील तर दाद मागायची कुणाकडे. सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे.
डॉक्टरच नाहीत मग रूग्णांना कोंबून ठेवायचं का? दानवेंचा सवाल
Updated on
Summary

जवळच्या नातलगाला कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे या संभ्रमात राजकीय कार्यकर्तेही सैरभैर झालेले आहेत.

शिवना (औरंगाबाद) : केंद्रात तुमच्या आणि राज्यात अब्दुल सत्तार यांच्या रूपाने राज्यमंत्रीपद मिळालेले असताना सिल्लोड- सोयगाव मतदार संघात एकही कोविड सेंटर (covid center) नाही, या प्रश्नावर कोविड सेंटर (covid center) सुरु करण्याच्या आमच्या हालचाली सुरु आहेत, मात्र त्यासाठी कुठे डॉक्टरच उपलब्ध नाहीत. त्यांनी त्यांचे स्वतःचे सेंटर सुरु केलेत. त्यामुळे आपण रुग्णांना कोविड सेंटरमध्ये नुसतं कोंबून ठेवायचं का.? असा अजब सवाल केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे (union minister of state MP raosaheb danve) यांनी उपस्थित केला. (As there is no doctor in covid center the question of why patients should be kept like this was raised by union minister of state MP raosaheb danve)

डॉक्टरच नाहीत मग रूग्णांना कोंबून ठेवायचं का? दानवेंचा सवाल
दिलासादायक! औरंगाबाद येथील रुग्णसंख्येत आणखी घट

लोकसभेच्या जालना मतदार संघाचे खासदार रावसाहेब दानवे यांना केंद्रात व सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांना राज्यात राज्यमंत्रीपद लाभलेले आहे. असे असताना कोरोनासंक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड- सोयगाव मतदार संघात एकही कोविड सेंटर नाही. याबाबत सकाळ ने शनिवारी (ता. आठ) श्री. दानवे यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला.

लोकप्रतिनिधिच जर या परिस्थितिला गांभीर्याने घेत नसतील तर दाद मागायची कुणाकडे. सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध नाही. रेमडेसीव्हीरचा तुटवडा आहे. जवळच्या नातलगाला कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे या संभ्रमात राजकीय कार्यकर्तेही सैरभैर झालेले आहेत. अशा बिकट परिस्थितीत मतदार संघाचे खासदार व आमदार या दोन्ही मंत्रीद्वयानी संकटमोचक म्हणून पुढे यावे आणि मतदार संघाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असे कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी होत आहे. या बाबत 'सकाळ' ने श्री. दानवे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे चक्राऊन टाकनारे उत्तर दिले.

(As there is no doctor in covid center the question of why patients should be kept like this was raised by union minister of state MP raosaheb danve)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()