छ. संभाजीनगर- शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची घटना घडली आहे. शिरसाट कुटुंबीय सोबत असतांना गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात ही घटना घडली आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
माहितीनुसार, जेव्हा दगड मारण्यात आला तेव्हा शिरसाट यांच्या पत्नी, कन्या आणि मुलगा गाडीतच होता. रस्त्यावर भांडण सुरू असल्याने शिरसाट कुटुंबीयांनी गाडी थांबवली होती. शिरसाट यांच्यागाडीवर दगड फेकल्याच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याशिवाय, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील जमा झाले होते.
शिरसाट यांच्या गाडीवर कोणी दगड मारलाहे अद्याप कळू शकलेले नाही. रस्त्यावर झालेल्या भांडणादरम्यान शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला की, त्यांना लक्ष्य करण्यासाठी दगड मारण्यात आला? याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. दरम्यान, सदर प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.