औरंगाबाद : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता आठवीसाठी परीक्षा रविवारी घेण्यात आली. या परीक्षेस पहिल्या पेपरला २१३ तर दुसऱ्या पेपरला २१५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
शहरातील १४ केंद्रावरील १८३ ब्लॉकमध्ये परीक्षा पार पडली. जिल्ह्याची एकूण क्षमता ४ हजार ३९२ इतकी आहे. मात्र, यंदा या परीक्षेला एकूण ४ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात मराठी माध्यम ४०७३, उर्दू माध्यमाचे ८७, इंग्रजी माध्यमाचे १११ तर हिंदी माध्यमाचे दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी पहिला पेपर ४ हजार ६० विद्यार्थ्यांनी दिला तर दुसरा पेपर ४ हजार ५८ विद्यार्थ्यांनी दिली.
पहिल्या पेपरला २१३ तर दुसऱ्या पेपरला २१५ विद्यार्थी गैरहजर होते. २००७-०८ शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे असा योजनेचा हेतू आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एक हजार असे वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
जखमी विद्यार्थिनीने दिली परीक्षा
परीक्षेच्या अनुषंगाने शारदा मंदिर कन्या प्रशालेत ग्रामीण भागातील एका अपघात झालेल्या विद्यार्थिनीने बेडवर बसून परीक्षा दिली. अंधारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या या अपघातग्रस्त विद्यार्थिनींसाठी तिच्याच हॉलमध्ये खास एका बेडची सोय शाळेतर्फे करण्यात आली होती. अपघात झाल्यामुळे तीचा पाय वाकू शकत नव्हता, त्यामुळे त्या विद्यार्थिनीचे पालक व शिक्षकांनी शाळेकडून काही सोय होईल का? अशी विचारणा केली होती. त्यांच्या विनंतीला मान देवून शाळेने तिच्यासाठी एक बेड उपलब्ध केला होता, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.