औरंगाबाद : आष्टी-मुंबई रेल्वे ठरणार ‘व्यापारवाहिनी’

बाजारपेठेला मिळणार चालना : आष्टीकरांकडून निर्णयाचे होतेय स्वागत
Aurangabad Ashti Mumbai railway
Aurangabad Ashti Mumbai railwaysakal
Updated on

आष्टी : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम आष्टीपर्यंत पूर्ण झाल्याने आष्टी ते मुंबई रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत आष्टी-मुंबई रेल्वे धावणार आहे. यातून तालुक्याच्या बाजारपेठेला चालना मिळणार असून, या निर्णयाचे आष्टीकरांमधून स्वागत होत आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत रेल्वेने ये-जा करण्याची व्यवस्था झाल्याने तालुक्यासाठी ही रेल्वे ‘व्यापारवाहिनी’ ठरण्याची आशा निर्माण झाली आहे.

Aurangabad Ashti Mumbai railway
कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला!

नगर-बीड-परळी रेल्वेचे नगर ते आष्टी या टप्प्यातील काम पूर्णत्वाला गेल्याने या मार्गावर काही दिवसांपूर्वी हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. बारा डब्यांची हायस्पीड रेल्वे नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर मार्गावरून धावली. त्यामुळे बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने दमदार पाऊल पडले आहे. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाल्याने आष्टीकर प्रचंड खूश आहेत.

आष्टी हे तालुक्याचे ठिकाण असून, पंधरा किलोमीटरवर तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे गाव असलेले कडा आहे. या दोन्ही ठिकाणाहून ही रेल्वे जाणार आहे. दोन्ही गावांचा रेल्वेने नगरसह पुणे-मुंबईशी थेट संपर्क होणार असल्याने व्यावसायिक दृष्टीने ही रेल्वेसेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आष्टी तालुक्यात सिंचन व्यवस्था वाढल्याने नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.

Aurangabad Ashti Mumbai railway
एससी, एसटीच्या १६ हजार जागा रिक्त; संख्यात्मक आकडेवारी सादर

शेती उत्पादनांना मोठ्या शहरांत बाजारपेठ मिळण्याचा मार्गही रेल्वेमुळे जास्त सोयीचा होणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनाही या रेल्वेचा मोठा उपयोग होणार आहे. शिक्षण-नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांनाही या रेल्वेचा मोठा लाभ होणार असल्याने रेल्वेसेवेच्या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

पुढील काम वेगाने पूर्ण होणे अपेक्षित

वर्ष २०१४ ला बीड रेल्वेचे काम सुरू झाले. मध्यंतरी कोरोनामुळे हे काम रखडले होते. त्यानंतर काम सुरू होऊन नगर ते आष्टी हे ६१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले. यापुढचे बीड व पुढे परळी असे काम सध्या सुरू आहे. अजून ४७ महत्त्वाचे पूल, ७४ छोटे पूल, ५२ रेल्वे ओव्हरब्रीज, २४ रेल्वे अंडरब्रीज आणि १७ स्टेशन इमारतींचे काम पूर्ण होणे बाकी आहे. बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण व्हावे, यासाठी गतिमान काम व्हावे, अशी अपेक्षा बीडकरांमधून व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()