शेतकऱ्यांना चालू हंगामात 69 कोटी 24 लाख 78 हजारांचं कर्ज वाटप; बँकेच्या कर्ज अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती

चालू हंगामात एकूण ११ हजार ६६० सभासदांना ६९ कोटी २४ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
Aurangabad Bank loan
Aurangabad Bank loanesakal
Updated on
Summary

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण तालुक्यातील एकूण १५ शाखाअंतर्गत तीन हजार ९०९ सभासदांना २८ कोटी ६२ लाख रुपयांचे खरीप हंगामाचे कर्ज वाटप करण्यात आले.

पाचोड : चालू हंगामात पैठण (Paithan) तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११ हजार ६६० सभासदांना ६९ कोटी २४ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज (loan) वाटप करण्यात आल्याची माहिती दावरवाडी (ता. पैठण) येथे कर्ज मेळाव्याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका कर्ज अधिकारी शामदादा तांगडे यांनी दिली.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (Aurangabad Central Cooperative Bank) दावरवाडी (ता. पैठण) येथे आयोजित कर्ज वाटप व कर्ज वसुली मेळाव्याप्रसंगी तांगडे बोलत होते. या मेळाव्यात बँकेच्या सभासदांना चालू खरीप हंगामात वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे, अशा राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांद्वारे सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Aurangabad Bank loan
OBC Andolan : लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ मुंबईला चर्चेसाठी जाणार नाही; ओबीसी समितीच्या बैठकीत मोठा निर्णय

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण तालुक्यातील एकूण १५ शाखाअंतर्गत तीन हजार ९०९ सभासदांना २८ कोटी ६२ लाख रुपयांचे खरीप हंगामाचे कर्ज वाटप करण्यात आले. यांत मागील वर्षी उचल केलेल्या कर्जदारांना या हंगामात वेळेवर परतफेड केलेल्या 'त्या' सभासंदाना दहा टक्के वाढीव कर्जाचे वाटप करण्यात आले. तर, रब्बी हंगामात ७७५१ सभासदांना ४० कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

Aurangabad Bank loan
'नैसर्गिक आपत्तीकाळात सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहणार'; अर्जुना धरणक्षेत्रासह अणुस्कुरा घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

चालू हंगामात एकूण ११ हजार ६६० सभासदांना ६९ कोटी २४ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या योजनेचा सर्वाधिक सभासंदानी लाभ घ्यावा, असे आवाहन पैठण तालुका कर्ज अधिकारी शामदादा तांगडे यांनी या आयोजित मेळाव्या प्रसंगी केले. या कार्यक्रमास तालुका अधिकारी एम. एस. लिपाने, चेअरमन राजेंद्र वाघमोडे, व्हाईस चेअरमन अरविंद तांगडे, संचालक बि. टी. तांगडे, मोहनराव जगताप, शिवप्रसाद भांडुरे, के. एस. दळे, प्रभाकर खंडागळे, लक्ष्मण खरग, पुरुषोत्तम जमधडे, सुनील इंगळे,अक्षय शिंदे व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.