औरंगाबाद हे नवीन औद्योगिक शहर बनत आहे : अमिताभ कांत

औरंगाबाद : ऑरिक सिटीच्या मुख्य इमारतीत डिझाइनची पाहणी करताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते आदी.
औरंगाबाद : ऑरिक सिटीच्या मुख्य इमारतीत डिझाइनची पाहणी करताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते आदी. सकाळ
Updated on
Summary

आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र (इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर) उभे राहिल्यास औरंगाबादचा परिसर हा हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर येथील औद्योगिक केंद्राप्रमाणे होईल, असा विश्‍वासही श्री. कांत यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद : डीएमआयसी DMIC, ऑरिक सिटीमुळे Auric (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) शेंद्रा-बिडकीनचे Shendra-Bidkin रूप बदलले आहे. देशातील सर्वांत वेगाने प्रगती झालेला हा भाग आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हे चित्र आमूलाग्र बदलणार आहे. शेंद्रा-बिडकीन हा भाग आता महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. तथापि, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद विभाग अधिक सक्षम व्हावा, यासाठी विमानतळ विस्तारीकरण तसेच आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर बनविणे गरजेचे आहे. यात निती आयोग राज्य सरकारच्या मदतीने रिजनल मास्टर प्लॅनसाठी पुढाकार घेणार आहे, अशी माहिती निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत NITI Ayog CEO Amitabh Kant यांनी शनिवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली. आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र (इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर) उभे राहिल्यास औरंगाबादचा परिसर हा हाँगकाँग Hongkong, मलेशिया, सिंगापूर येथील औद्योगिक केंद्राप्रमाणे होईल, असा विश्‍वासही श्री. कांत यांनी व्यक्त केला. श्री.कांत यांनी शनिवारी ऑरिक सिटीची पाहणी केली. डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते यांची उपस्थिती होती.Aurangabad Becomes Industrial City, Said Amitabh Kant

औरंगाबाद : ऑरिक सिटीच्या मुख्य इमारतीत डिझाइनची पाहणी करताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते आदी.
लातूर जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू

श्री. कांत म्हणाले की, ज्याप्रमाणे चंडीगड, गांधीनगर ही राजधानीची शहर बनली त्याचप्रमाणे डीएमआयसी आणि ऑरिकमुळे औरंगाबाद हे नवीन औद्योगिक शहर बनत आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवून त्याचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरही खूप आवश्‍यक आहे. यामुळे उद्योग आणि पर्यटनास फायदा होईल. यापूर्वी मी औरंगाबादला अनेकदा आलो आहे. वेरूळ, अजिंठा येथील विकासकामांना माझ्या काळात मंजुरी दिली गेली. त्याठिकाणी आम्ही अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. पर्यावरणपूरक बस सुरू केल्या. त्यानंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)चा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शेंद्रा-बिडकीनचा मास्टर प्लॅन केला. त्यावेळी अनेकांनी शंका उपस्थित केली होती. मात्र, याठिकाणी आता नवीन शहर प्रत्यक्षात साकारत आहे. औद्योगिकदृष्ट्या देशातील अव्वल शहरांपैकी हे एक शहर असेल. सध्या शेंद्रा परिसरात ७३ उद्योग आले. भविष्यात बिडकीन परिसराचाही विकास होईल. या भागात आम्ही गृह प्रकल्प, रुग्णालये असे प्रकल्पही साकारणार आहोत, असेही श्री. कांत यांनी नमूद केले.

औरंगाबाद : ऑरिक सिटीच्या मुख्य इमारतीत डिझाइनची पाहणी करताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते आदी.
म्हणून सरकारने शहरांची तीन भागात केली वर्गवारी- राजेश टोपे

अमिताभ कांत म्हणाले...

-ऐतिहासिक वारसा, औद्योगिकीकरण, जागतिक पर्यटनस्थळे असलेला हा भाग देशात एकमेव असावा.

-येथील परिपूर्ण विकासासाठी ऑरिक एमआयडीसीचे पोटॅन्शिअल वाढविण्यावर मेहनत करणार आहोत.

-निती आयोग आणि राज्य सरकार एकत्र येऊन या भागासाठी संपूर्ण सुविधांचा मास्टर प्लॅन बनविणार.

-कोरोनानंतर सगळे संदर्भ बदलले आहेत. अनेक बदल होतील, नियम व अटींमध्ये सूट द्यावी लागेल.

-नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

- पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील.

- एक लाख ११ हजार कोटींचे स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे प्लॅन भविष्यात केले जाणार आहेत.

राज्याने जागा दिली नाही

उद्योग आणि पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेले कन्व्हेंशन सेंटर औरंगाबादेत उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात जागाही निवडली होती. मात्र, ही जागा आम्हाला मिळाली नाही. ही जागा राज्य सरकारने दिली असती तर आम्ही कन्व्हेंशन सेंटर तयार करून दिले असते. डीएमआयसीसाठी आम्ही खूप मेहनत घेतली. राज्य सरकारने स्वस्त दरात आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्यास हे सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे अमिताभ कांत यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()