औरंगाबाद : आधी होता विषारी धूर, आता तयार होतोय गॅस

कांचनवाडीत रोज ११ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया
Aurangabad Before there was toxic smoke now gas being produced
Aurangabad Before there was toxic smoke now gas being producedsakal
Updated on

औरंगाबाद : कचराकोंडीमुळे महापालिकेची (Aurangabad Municipal Corporation) पाच वर्षांपूर्वी राज्यभर मोठी बदनामी झाली. शहरात जागोजाग साचलेला कचरा पेटवून देण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण (Pollution) वाढले. पण आता चित्र बदलले असून, विषारी धुराचे लोट निघणाऱ्या कचऱ्यातून आता गॅस तयार होत आहे. कांचनवाडी येथील प्रकल्पात दररोज ११ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झालेली आहे. या गॅसपासून कंत्राटदार वीज निर्मिती करणार आहे.

Aurangabad Before there was toxic smoke now gas being produced
चीनची आता ‘एआय’आधारित न्यायाधीश यंत्रणा

नारेगावर येथील कचरा डेपोविरोधात परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये महापालिकेची मोठी कोंडी झाली. शहरात दररोज निघणारा सुमारे साडेचारशे टन कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला. महापालिका हतबल झाल्याने नागरिकांनी कचऱ्याचे ढीग अक्षरशः पेटवून दिले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. शेवटी राज्य शासन महापालिकेच्या मदतीला धावून आले व कांचनवाडी, पडेगाव, हर्सूल व चिकलठाणा येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील हर्सूल वगळता तीन प्रकल्प सुरू झाले आहेत.

Aurangabad Before there was toxic smoke now gas being produced
औरंगाबाद मध्ये आता घरी जाऊन लस!

पडेगाव व चिकलठाणा येथील कचऱ्यावर रोज तीनशे ते साडेतीनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याचे कंत्राट महापालिकेने बॅनको कंपनीला दिले आहे. पण प्रकल्प कार्यान्वित करण्यास विलंब होत असल्याने महापालिकेने कंत्राटदाराला नोटीस बजावली होती. त्यानंतर कंपनीने प्रकल्प कार्यान्वित केला आहे. याठिकाणी दररोज ११ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू असल्याचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.

३० टनाची क्षमता

या प्रकल्पाची क्षमता दररोज ३० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. असे असले तरी सध्या ११ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती होत असल्याने पडेगाव व चिकलठाणा केंद्रावरील कचऱ्याचा भार कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.