आमदार प्रदीप जैस्वाल यांना जामीन मंजूर

औरंगाबाद : आमदार प्रदीप जैस्वाल
औरंगाबाद : आमदार प्रदीप जैस्वाल
Updated on
Summary

शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश परिस्थितीत क्रांती चौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन शिवसैनिकांना अटक केली होती. त्यावेळी २० मे २०१८ रोजी रात्री प्रदीप जैस्वाल पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना जाब विचारला.

औरंगाबाद : शहरात दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या प्रकरणात त्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी आमदार प्रदीप जैस्वाल MLA Pradip Jaiswal यांना सत्र न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, जैस्वाल यांनी जामिनासाठी खंडपीठात Aurangabad High Court Bench धाव घेतली असता, न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या पीठाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह अटी शर्तींवर नियमित जामीन मंजूर केला. शहरात Aurangabad निर्माण झालेल्या दंगलसदृश परिस्थितीत क्रांती चौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन शिवसैनिकांना Shiv Sena अटक केली होती. त्यावेळी २० मे २०१८ रोजी रात्री प्रदीप जैस्वाल पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना जाब विचारला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक केली. त्यांना तत्काळ जामिनावर सोडा, अशी मागणी करीत जैस्वाल यांनी गोंधळ घालत टेबलावरील काचा फोडत, खुर्च्यांची फेकाफेक केली होती. या प्रकरणात सुनावणीअंती सत्र न्यायालयाने कलम ३५३ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिने व अडीच हजार रुपये अशी शिक्षा सुनावली होती.aurangabad bench granted bail to mla pradip jaiswal

औरंगाबाद : आमदार प्रदीप जैस्वाल
उमरग्यात ग्रामसेवक संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू

या प्रकरणात जैस्वाल यांनी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत खंडपीठात जामिनासाठी अर्ज सादर केला असता, खंडपीठाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह अटीशर्तींवर नियमित मंजूर केला. ॲड. देशमुख यांना ॲड. देवांग देशमुख आणि ॲड.. गोविंद कुलकर्णी यांनी साहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.