Video: पैठण तालुक्यातील आडुळमध्ये कोरोना काळात दुकाने सुरु, प्रशासनाकडून कारवाई

मंगळवारी येथील शाहारुख किराणा, संपदा वस्त्र दालन, पठाण मोबाईल शॉपी, एसएन साईकल मार्टसह आठवडे बाजारात दुकानात थाटुन बसलेल्या व्यापाऱ्यांवर या पथकाने दंडात्मक कारवाई केली.
आडूळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : अनेक व्यापारी व दुकानदारांवर नायब तहसीलदार कमल मनोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दंडात्मक कारवाई केली.
आडूळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : अनेक व्यापारी व दुकानदारांवर नायब तहसीलदार कमल मनोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दंडात्मक कारवाई केली.
Updated on

आडुळ (जि.औरंगाबाद) : गेल्या अनेक (Aurangabad) दिवसांपासून आडुळ (ता.पैठण) (Paithan) येथे अनाधिकृत आठवडे बाजार (Weekly Market) भरविणारे व्यापारी (Traders) व बाजारपेठेत (Market) सकाळी अकरा वाजल्यानंतर ही कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. पण बिनधास्तपणे दुकाने उघडे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीला (Disaster Mangement Comittee) मिळताच मंगळवारी (ता.११) अनेक व्यापारी व दुकानदार यांच्या नायब तहसीलदार कमल मनोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दंडात्मक कारवाई केली. यात तब्बल २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी येथील शाहारुख किराणा, संपदा वस्त्र दालन, पठाण मोबाईल शॉपी, एसएन साईकल मार्टसह आठवडे बाजारात दुकानात थाटुन बसलेल्या व्यापाऱ्यांवर या पथकाने दंडात्मक कारवाई केली. यात २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पथकप्रमुख नायब तहसीलदार कमल मनोरे, मंडळ अधिकारी भारती मादनकर, ग्रामविकास अधिकारी बळीराम कळमकर, तलाठी भाऊसाहेब ठोरमारे, बीट जमादार रविंद्र क्षीरसागर, पोलिस पाटील भाऊसाहेब पिवळ यांच्या पथकाने केली. (Aurangabad Breaking News Action Against Shop Owners In Adul Paithan)

आडूळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : अनेक व्यापारी व दुकानदारांवर नायब तहसीलदार कमल मनोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दंडात्मक कारवाई केली.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा अजब कारभार, लसीकरण व कोरोना चाचणी एकाच ठिकाणी

सरपंचाच्या दुकानावर कारवाई

येथील सरपंच शमीम नासेर शेख यांची एसएन साईकल मार्ट ही दुकान बाहेरुन कापडा बांधून आत चालु असल्याचे पथकाला निदर्शनास आल्याने पथकाने येथील सरपंच यांच्या दुकानावर दंडात्मक कारवाई करीत पाच हजाराचा दंड ठोठावला. सरपंचाच्याच दुकानावर कारवाई झाल्याने इतर दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद करुन काढता पाय घेतला.

जे दुकानदार स्वतःची कोरोना चाचणी करणार नाही, त्यांना दुकाने उघडे ठेवू देणार नसून अकरानंतर परवानगी नसलेल्या सर्व दुकानदारांवर आता दररोज कारवाई करण्यात येणार आहे.

- कमल मनोरे, नायब तहसीलदार, पैठण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()