चितेगावात महिलाराज! ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक महिला उमेदवार विजयी

Gram panchayat election
Gram panchayat election
Updated on

चितेगाव (जि.औरंगाबाद) : चितेगाव (ता.पैठण) येथील ग्रामपंचायत सार्वञिक निवडणूकीत पंधरा जागेसाठी एकूण ३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यात दोन पॅनलचे ३० व ९ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. यामध्ये १० महिला निवडून आल्या तर एका महिलेची बिनविरोध निवड झाली होती. त्यामध्ये १७ सदस्याच्या ग्रामपंचायत मध्ये ११ महिला व ६ पुरुष असल्याने चितेगाव ग्रामपंचायत मध्ये महिला राज स्थापित होईल.

येथे मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत असून छोटीमोठी सत्तर ते ऐंशी कारखाने आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतला करापोटी एक कोटींपेक्षा जास्त उत्पन्न आसल्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणूकीत अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. ग्रामपंचायतीमध्ये एकूण सतरा जागा असून दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

आता पंधरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलचे सात व चितेगाव विकास एकता पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. तर नऊ अपक्ष पैकी एकाला ही आपला विजय निचित करता आला नाही.    
निवडणुकीत एकूण सतरा पैकी प्रभाग एक व दोनमध्ये जनसेवा विकास पॅनेलचे आत्माराम विठ्ठोबा नजन व सोनाली नवनाथ नजन यांची यापुर्वीच बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे एकूण सहा प्रभागत पंधरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत.

यामध्ये प्रभाग क्रं. दोन मधून अर्चना अजय नरवडे, जनकाबाई सुखदेव गिधाणे, तीन मधून गोदावरी विजय गिधाणे, चार मधून बसवेश्वर मारोतराव नजन, पाच मधून कमल रमेश ञिभुवन, शितल परमेश्वर नजन व कृष्णा सुखदेव गिधाणे विजयी झाले आहेत. तर चितेगाव विकास एकता पॅनेलचे प्रभाग क्रं. एक मधुन जयश्री नितीन गिधाणे,तीन कडूबाळ शंकर नरवडे,सरजाबाई रामभाऊ गायकवाड,चार मधुन सय्यद हबीबाबी अन्वर,शेख वाहेद याकुब,सहा मधुन रंजना कैलास नरवडे,सय्यद शमीनाबी फेरोज व कदिर खान पठाण विजयी झाले आहे.

माजी उपसभापती कृष्णा गिधाणे यांनी  जनसेवा ग्रामविकास पॅनल स्थापन करुन स्वतःसह आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. यात त्यांनी बाजी मारली असून दोन बिनविरोध व सात उमेदवार विजयी झाल्याने सतरा पैकी नऊ जागा मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.