औरंगाबाद : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवा

स्वयंरोजगार मेळाव्यात आमदार दानवे यांचे आवाहन
MLA Ambadas Danve
MLA Ambadas Danve sakal
Updated on

औरंगाबाद : निवडणुकांना सामोरे जाताना लोकांना प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे. एका एका वॉर्डात दहा लोकांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी स्वावलंबी बनवून त्यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम केले तर वॉर्डात हजार मतदान तयार होईल. यासाठी लोकांपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पोहोचवणे गरजेचे आहे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.

शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत पाटीदार भवनात शनिवारी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजी महापौर नंदकुमार घोडेले, मध्य विभागाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, पूर्व विभागाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, अनिल पोलकर , प्राजक्ता राजपूत , बाबासाहेब डांगे , प्रतिभा जगताप, मुख्यमंत्री कार्यालयातील सचिन पवार , जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक विश्वनाथ भोंबे , पशुपालन व शेळीपालन संस्थेचे बी. एस. नाईकवाडे यांची उपस्थिती होती.

स्वयंरोजगार मेळाव्यात बोलताना आमदार श्री. दानवे म्हणाले, की तरुण-तरुणींना स्वावलंबी बनविण्यासाठी आठ दिवसांपूर्वी मुंबईत चर्चा झाली. मुंबईनंतर औरंगाबादमध्ये स्वयंरोजगार मेळावा घेतला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १० लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते त्यासाठी कोणतेही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही.

बँकेत चकरा मारण्याची गरज नाही, फक्त कागदपत्रे जमा करा मुख्यमंत्र्यांनी ही योजना आपल्या दारात आणून दिली आहे. काही करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम शिवसैनिकांना करायचे आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयासमोर किमान एक बॅनर लावून ही योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करावे. सर्व कागदपत्रे आणि फॉर्म भरून शिवसेनेच्या क्रांतीचौक येथील कार्यालयात जमा करावे ५ मे पर्यंत हे अर्ज स्विकारले जातील असेही श्री. दानवे यांनी सांगितले.

श्री. पवार म्हणाले, आपण व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्या कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, बँकेत येणाऱ्या अडचणी सोडवण्यापासून ते कर्ज मंजूर होईपर्यंत आपल्याला याविषयी मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार आहे. श्री. घोडेले यांनी स्वयंरोजगार मेळाव्यातील संधींचे सोने करण्याचे आवाहन केले. श्री.भोंबे, श्री. नाईकवाडे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष बोर्डे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.