औरंगाबाद : शहरात वाढणार २० नगरसेवक

शासनाच्या निर्णयामुळे संख्या जाणार ११५ वरून १३५ वर
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation Newssakal
Updated on

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असतानाच राज्य शासनाने बुधवारी (ता. २७) शहराची वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद महापालिकेत आता २० सदस्य वाढणार आहेत. यापूर्वी असलेल्या ११५ वरून सदस्यांची संख्या १३५ वर पोचणार आहे तर प्रभागांची सख्या ४५ एवढी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेच्या आगामी निवडणुका त्रिसदस्यीय (मुंबई वगळता) प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वी घेतला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला पत्र देत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना केली. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी त्यासाठी समिती स्थापन केली आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असतानाच बुधवारी राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेत सदस्यांच्या संख्येत १७ टक्के एवढी वाढ केली आहे.

Aurangabad Municipal Corporation News
तारीख पे तारीख... आर्यन खानच्या जमीनावर आजही निर्णय नाहीच!

शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १२ लाख २८ हजार ३२ एवढी आहे. २०२१ मध्ये जनगणना अपेक्षित होती; पण कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जनगणनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे वाढील लोकसंख्येचा अंदाज गृहीत धरून महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्येमध्ये वाढ केली जाणार आहे. औरंगाबाद महापालिकेची सदस्य संख्या सातारा-देवळाईच्या समावेशानंतर ११५ एवढी झाली होती.

त्यात अनुसूचित जाती २२, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांचा मागासवर्ग ३१, नागरिकांचा खुला प्रवर्ग ६० याप्रमाणे आरक्षण होते. आता सदस्य संख्या २० ने वाढणार असून, ती १३५ एवढी होणार आहे. शहराची लोकसंख्या १२ लाख ते १४ लाख दरम्यान असल्यामुळे त्या मर्यादेतच सदस्यसंख्या ठेवली जाणार आहे. २० सदस्य वाढणार असल्यामुळे प्रभागाची संख्या ३८ वरून आता ४५ वर जाणार आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार असल्यामुळे नव्याने प्रभाग रचना आणि वॉर्डांच्या सीमारेषा निश्चित कराव्या लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Aurangabad Municipal Corporation News
शुल्क सुधारणा समितीच बरखास्त करा : मेस्टाची मागणी

नगरसेवक संख्येचे

असे आहेत निकष

- ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या- कमीत कमी ९६ व जास्तीत जास्त १२६

-१२ लाखापेक्षा अधिक व १४ लाखापर्यंत लोकसंख्या- कमीत कमी १२६ व जास्तीत जास्त १५६

-२४ लाखापेक्षा अधिक व ३० लाखापर्यंत लोकसंख्या- कमीत कमी १५६ व जास्तीत जास्त १६८

-३० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या- कमीत कमी १६८ व जास्तीत जास्त १८५.

निवडणूक पडणार लांबणीवर

महापालिकेची निवडणूक आगामी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता आणखी दोन महिने निवडणूक लांबणीवर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अशी वाढली नगरसेवक संख्या

१९८८-६०

१९९५-८३

२०००-८५

२००५-९९

२०१०-९९

२०१५-११३-२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()