पत्नीला बेदम मारहाण; पीएसआयसह पोलिस शिपाई प्रेयसीवर निलंबनाची कारवाई

काही वर्षापासून शैलेश जोगदंड व ग्रामीण वाहतूक शाखेतील महिला शिपाई प्रियंका तळवंदे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.
पत्नीला बेदम मारहाण; पीएसआयसह पोलिस शिपाई प्रेयसीवर निलंबनाची कारवाई
Updated on

औरंगाबाद : पत्नीला घरात कोंडून बेदम मारहाण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पोलिस शिपाई प्रेयसीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. शैलेश उद्धवराव जोगदंड (वय ४०, रा. स्नेहनगर) असे पत्नीला घरात कोंडून मारहाण करणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर प्रियंका सुरेश तळवंदे (वय २९) असे प्रेयसीचे नाव आहे. या दोघांनाही पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तडकाफडकी निलंबित केले.

वैशाली शैलेश जोगदंड (वय ३५, रा.स्नेहनगर) व शैलेश जोगदंड हे पती-पत्नी आहेत. शैलेश जोगदंड हे देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. काही वर्षापासून शैलेश जोगदंड व ग्रामीण वाहतूक शाखेतील महिला शिपाई प्रियंका तळवंदे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. या कारणावरून वैशाली जोगदंड व शैलेश यांच्यात नेहमीच भांडणे होत होती.

शुक्रवारी दुपारी शैलेश जोगदंड व प्रियंका तळवंदे यांनी वैशाली जोगदंड यांना घरात कोंडून बेदम मारहाण केली. याप्रकरणी वैशाली जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शैलेश जोगंदड व प्रियंका तळवंदे यांच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक शारदा लाटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.