मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून सततच्या टाळेबंदीमुळे पूर्णतः धंदा बुडून तो आर्थिक विवंचनेत सापडला. तो बऱ्याच दिवसांपासून चिंताग्रस्त राहत होता.
पाचोड (जि.औरंगाबाद) : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका तीस वर्षीय पिग्मी एजंटने कुटुंबातील सदस्य बाहेर गेल्याचे पाहुन राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पाचोड (ता पैठण) Paithan येथील शिवाजीनगर भागात बुधवारी (ता. सात) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. चार दिवसांपूर्वी एकवीस Aurangabad वर्षीय भावी शिक्षिकेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेचे विस्मरण होत नाही, तोच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय आण्णासाहेब वखरे असे आत्महत्या करणाऱ्या यूवकाचे नाव आहे. aurangabad crime news youth hanged himself in pachod tahsil of paithan
पाचोड येथील शिवाजीनगर येथे राहणारा विजय वखरे घरची परिस्थिती हलाखीची असल्याने एका बँकेचा पिग्मी एजंट म्हणुन कामास होता. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याने बँकेकडून काही कर्ज घेऊन एक किराणा दुकान सुरू केली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून सततच्या टाळेबंदीमुळे पूर्णतः धंदा बुडून तो आर्थिक विवंचनेत सापडला. तो बऱ्याच दिवसांपासून चिंताग्रस्त राहत होता. बुधवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घरातील सदस्य गावात गेले असता त्याने संधी साधुन पत्र्याच्या घराच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. थोड्या वेळाने घरातील सदस्य घरी आले असता त्यांनी विजयचा अँगलला लटकलेला मृतदेह पाहुन हंबरडा फोडला.
त्यांच्या ओरडण्याचे आवाज ऐकूण शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने त्यास खाली उतरवून येथील ग्रामीण रुणालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीपान काळे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलिसांना माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार किशोर शिंदे, सुधाकर मोहिते आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहिते, पवन चव्हाण करित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.