डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून, वैजापूर तालुक्यातील घटना

crime
crime
Updated on
Summary

औरंगाबाद-नाशिक महामार्गालगत बंद असलेल्या शुगर मिलजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता या तरुणाचा चेहऱ्यावर व गळ्यावर जखमा असलेला मृतदेह आढळून आला.

शिऊर (जि.औरंगाबाद) : गारज (ता.वैजापूर) (Vaijapur) येथील शुगर मिलजवळ एका ३५ वर्षीय युवकाचा सोमवारी (ता.२४) मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह बाजारसावंगी येथील तरुणाचा असल्याचे समोर आले असून त्याचा गळा आवळून व डोक्यात दगड मारून खून केल्याचे स्पष्ट झाल्याने शिऊर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. अण्णा उत्तम जाधव (वय ३५, रा.बाजारसावंगी ता.खुलताबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद -नाशिक महामार्गालगत (Aurangabad-Nashik Highway) बंद असलेल्या शुगर मिलजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता या तरुणाचा चेहऱ्यावर व गळ्यावर जखमा असलेला मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरख शेळके, वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकास पाचारण केले. (Aurangabad Crime News Youth Killed In Vaijapur Block)

crime
उद्धव ठाकरे, मोदींनी टिव्हीवर येताना गरिबांचाही विचार करावा: इम्तियाज जलील

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सकाळपासून सोशल मीडियावर (Social Media) मृतदेहाचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. तब्बल सहा ते सात तासातच सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतदेह बाजारसावंगी येथील तरुणाचा असल्याचे समोर आले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मृताचा भाऊ ज्ञानेश्वर उत्तम जाधव यांनी शिऊर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीने गळा आवळून डोक्यात दगड मारून खून केल्याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, पोलिस कॉन्स्टेबल विष्णू जाधव, संदीप धनेधर, किरण रावते, अमोल कांबळे, फौजदार जी.टी. राऊत, पोलिस हेडकाँस्टेबल देशमुख, निकम, पोलिस काँस्टेबल मेटे हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.