Aurangabad : गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा फरारी जेरबंद

चिखलीतून केली अटक रांजणगावात घडली होती घटना
Crime
Crimesakal
Updated on

वाळूजमहानगर : जुन्या वादातून वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे दोन जणांनी सागर सदार यांच्यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले. त्यातील एका आरोपीला चिखली येथून शुक्रवारी जेरबंद केले.

कमळापूर येथील सागर सदार व त्यांचा मित्र जावेद पठाण हे दोघे शुक्रवारी (ता.१४) रात्री सोबत घरी येत असताना घराच्या परिसरात राहणारे गजू मोरे व प्रभू चव्हाण यांनी सागरला अडवून वाद घातला. त्यावेळी प्रभू चव्हाणने तलवार सागरच्या खांद्यावर मारली; परंतु पाठीवर बॅग असल्याने वार चुकला.

दरम्यान सागरने दोन्ही आरोपीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. यावेळी गजू मोरे याने गावठी बंदुकीने फायर केले. त्यात सागरच्या उजव्या बरगडीजवळ गोळी लागली व रक्तस्राव सुरू झाला. याप्रकरणी सागर सुभाष सदार, वय २८ वर्षे, रा.कमळापूर याच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपासात पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आरोपींचा शोध घ्याण्यासाठी ५ अधिकारी यांचे पाच पथक तयार करून तत्काळ आरोपींच्या मूळगावी तसेच परभणी, नांदेड, जालना, नाशिक, लोणार, बुलडाणा येथे रवाना केले.

पथकाने शुक्रवारी फरार असलेला आरोपी गजानन सुभाष मोरे यास चिखली, जि.बुलडाणा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संदीप गुरमे तसेच पोलिस कर्मचारी चेतन ओगले, राहुल निर्वळ, बाबासाहेब काकडे यांनी केली.

दरम्यान या प्रकरणातील आणखी एक फरार असलेला आरोपी प्रभू चव्हाण हा अद्यापही फरारच आहे. शिवाय या गुन्ह्यात वापरलेली गावठी बंदूक (पिस्तूल) व तलवार जप्त करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.