औरंगाबाद : जिल्हा दुध सहकारी महासंघाच्या १४ जागांपैकी सात जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीचा प्रचार गुरुवारी (ता.२०) थांबला. आता मतदानाकडे लक्ष लागले आहे. शनिवारी (ता.२२) मतदान होणार असून जिल्ह्यातील ३४६ मतदार हक्क बजावणार आहेत. दरम्यान गुरुवारी पैठण आणि फुलंब्री मतदारसंघासाठी झालेल्या बैठकीत आमदार हरिभाऊ बागडेंसह (Haribhau Bagade) माजी संचालकांच्या विजयासाठी मतदारांनी साद घालण्यात आली. सुरुवातीला बिनविरोध की, निवडणूकी यात भाजप-काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे सात जागा बिनविरोध आणण्यात यश आले. मात्र ज्यांच्यासाठी प्रयत्न झाले, ते बागडे यांची मात्र निवडणूक लागली. निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात सर्वपक्ष एकत्र येत उभे केलेल्या पॅनलसाठी कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्र्यासह काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीतर्फे जोर लावण्यात आला. (Aurangabad District Milk Federation Election Updates, All Political Parties Come Together For Haribhau Bagade)
यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे. सात जागांपैकी आमदार हरिभाऊ बागडे, माजी संचालक गोळुकसिंग राजपूत, संदीप बोरसे, कचरू डिके, शिलाबाई कोळगे, अलका डोणगावकर, पुंडलिकराव काजे यांचे एक पॅनल आहे. यांच्यासाठीच मोठा जोर लावण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर विरोधी पॅनलमधील तीन ते चार उमेदवारांनाही मॅनेज करण्यात आली असल्याचे चर्चा असून गुरुवारी दोन तालुक्यासाठी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षातील उमेदवारांनीही हजेरी लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे ही निवडणूक केवळ नावासाठीच असल्याचेही चर्चा सुरु आहे. (Aurangabad District Milk Federation Election Updates)
बागडे बिन खर्चाचे चेअरमन - सत्तार
दोन तालुक्यासाठी झालेल्या शेवटच्या बैठकीस कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare), राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. बैठकीत सत्तार म्हणाले की, दुध संघात आमदार बागडे यांनी अनेक कामे केली. वेगवेगळे पदार्थ बनविले. सेवा समर्पण भावनेने काम केले. बागडे हे बिगर खर्ची चेअरमन असल्याचेही सत्तार सांगितले. भुमरे म्हणाले की, मरठवाड्यात दुध संघाची वेगळी ओळख निर्माण केली. संघ फायद्यात (Aurangabad) ठेवला. दुध संघ वाचवायचा असेल तर बागडे शिवाय पर्याय नसल्याचे भुमरे यांनी सांगितले. यावेळी रामुकाका शेळके, श्रीराम शेळके, सुनील शिंदे, रमेश डोणगावकर, बिनविरोध झालेली उमेदवार, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे व मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.