औरंगाबाद : दहावी, बारावीची परीक्षा केंद्रे दुपटीने वाढली

Aurangabad division 626 for 10th exam standard and 408 for 12th  exam standard
Aurangabad division 626 for 10th exam standard and 408 for 12th exam standardsakal
Updated on

औरंगाबाद : औरंगाबाद विभागीय मंडळातील जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेसाठी ६२६ तर, बारावीसाठी ४०८ मुख्य केंद्रे निश्चिती झाली होती. मात्र, प्रवेशित शाळा, महाविद्यालयातच परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विभागात मुख्य केंद्रांना संलग्नित शाळा, महाविद्यालयांत दहावीसाठी एक हजार ८२२; तर बारावीसाठी ८५५ या उपकेंद्रांवरही परीक्षेचे नियोजन विभागीय मंडळाकडून करण्यात येत आहे.

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च तर, लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होईल. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान व लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्चदरम्यान होईल. दहावी बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर तर प्रात्यक्षिक ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित होतील. विभागातून दहावीसाठी एक लाख ८१ हजार ६०२ तर, बारावीसाठी एक लाख ६५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

औरंगाबाद विभागीय मंडळातील मुख्य केंद्रे, त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती पूर्ण झाली असून वाढीव केंद्रांची पूर्वतयारी सुरू आहे. संलग्न शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र देण्यात येणार असून त्याची तयारीही जवळपास अंतिम टप्प्यात आहे. परीक्षार्थ्यांना बसण्याची बेंच, कक्षात पंखे, लाइट, केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधांच्या तयारीसह परीक्षेच्या नियोजनासंदर्भात जिल्हानिहाय बैठका विभागीय मंडळ घेणार आहेत. त्यात सुरवातीला शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची बैठक होईल.

त्यानंतर केंद्र प्रमुखांची बैठक जिल्हानिहाय ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे विभागीय मंडळाचे सचिव आर.पी. पाटील यांनी सांगितले. दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी जिल्हानिहाय १-२ समुपदेशक, शंका निरसनासाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात येणार आहे. त्यात शाखा व विभाग प्रमुखांचे संपर्क क्रमांक विद्यार्थ्यांना दिले जातील. त्यातून विद्यार्थी परीक्षेसंदर्भातील शंका निरसन करू शकतील, असेही पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.