चिकनप्रेमींना 'महागाईच्या' झळा

इंधन, कोंबडीच्या खाद्यात झालेल्या दरवाढीचा फटका
Aurangabad Inflation chicken and fule rate increase also chicken feed
Aurangabad Inflation chicken and fule rate increase also chicken feedsakal
Updated on

औरंगाबाद : इंधन दरवाढ, कोंबडीच्या खाद्यात झालेल्या दरवाढीमुळे चिकनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मटणाचे भाव वाढल्याने मांसाहारप्रेमी चिकनकडे वळले होते. मात्र, आता चिकनचे भावही वाढले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्रीचालकांना कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. तर कित्येकांना फुकटात वाटप कराव्या लागल्या. मात्र, दीड वर्षापूर्वी हेच दर १२० ते १४० रुपये प्रती किलोपर्यंत होते. आता चिकनचे दर दुप्पट झाले आहेत. २५० ते २७० रुपये प्रतिकिलो दराने चिकनची विक्री होत आहे. कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला होता. बाजारात चिकनच्या दरात मोठी घट झाली होती. पूर्वी ८० ते ९० रुपयांना मिळणारी जिवंत कोंबडी आज १५० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे चिकनची २६० ते २८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केले जात आहे. कोंबड्यांची संख्या कमी झाल्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गावरानचे दर कायम

बॉयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरान चिकन (जिवंत कोंबडा) ५६० रुपये किलो दराने विक्री होत आहे, तर डुप्लिकेट गावरान म्हणून संबोधले जाणारे जिवंत कोंबडे २७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. हैदराबादी कोंबडीचे दर २८० रुपये किलो असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य, वाहतूक, वाढलेल्या किमतीमुळे चिकनचे दर वाढले आहेत. खाद्याचे दर दुप्पट झाले असल्याने पक्ष्यांचा सांभाळ करण्यास ९० ते १०० ते रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या मार्केटमध्ये चिकनचा तुटवडा आहे. मार्केटमध्ये आवक कमी आणि मागणी कायम असल्याने दर वाढत चालले आहेत.

-सद्दाम मोहम्मद हुसेन आदमाने, चिकन शॉपचे मालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()