औरंगाबाद : रेल्वेच्या पीटलाईनच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सोमवारी (ता.३) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना येथील पीटलाइनचे भूमिपूजन होत आहे. मात्र, भूमिपूजनानंतर पीटलाईनच्या कामाला वेग देण्याच्या बरोबरच अन्य प्रश्नही सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री पुढाकार घेतील का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे.
दक्षिण मध्य रेल्वे सातत्याने मराठवाड्याला सापत्न वागणूक देत आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. औरंगाबादेत पीटलाईन करण्याची जुनी मागणी आहे. मात्र, रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबादची पीटलाईन जालना येथे पळविण्यात आली. त्यानंतर मोठा रोष व्यक्त झाल्यामुळे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व उद्योजकांच्या पाठपुराव्यामुळे अखेर औरंगाबादलाही पीटलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे दोन्ही ठिकाणच्या पीटलाईचे आज उद्घाटन होत आहे.
मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच आहे. त्यातच रेल्वे गाड्यांची संख्याही कमी आहे. नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच वर्षांनुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्री आणि डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आता रेंगाळलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लागण्यास सुरवात झाल्याचे दिसत आहे. असे असले तरीही अनेक प्रस्ताव अजूनही लालफितीत अडकले आहेत.
मराठवाड्यात रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षानुवर्षे येथे परभणी-मनमाड या २९१ किलोमीटर अंतराच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने संमती दर्शविलेली आहे. मात्र, या मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचाही जावई शोध रेल्वेचे अधिकारी कायम लावतात. त्यामुळेच लोकसभेत रेल्वेमंत्री वैष्णव यांनीही असेच उत्तर दिले होते. असे असले तरीही अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाचे सर्वेक्षण झाले. मात्र, पूर्ण परभणी-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण कधी होणार? हा खरा प्रश्न आहे.
अनेक कामे रखडली
औरंगाबाद-नगर असा रेल्वे प्रवास करण्यासाठी मनमाडमार्गे जवळपास ११३ किलोमीटर अधिक अंतर आहे. त्यामुळेच औरंगाबाद-नगर लोहमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. औरंगाबादचा रेल्वेस्थानकाचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला. मात्र, हे सर्व कागदावरच आहे. प्रत्यक्षात मॉडेल स्थानक केव्हा होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
मराठवाड्याच्या रेल्वेचे प्रश्न सुपरफास्ट सुटावे
रेल्वेमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
पीटलाईन भूमिपूजन सोहळा आज
औरंगाबाद आणि जालना येथील पीटलाईनचे भूमिपूजन सोमवारी (ता. तीन) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होत आहे. औरंगाबादच्या पीटलाईनचे सकाळी साडेनऊ वाजता भूमिपूजन होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत आदींची उपस्थिती असणार आहे.
असे आहेत प्रलंबित प्रश्न
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे.
औरंगाबाद-नगर लोहमार्ग गतीने पूर्ण होणे गरजेचा
उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद, औरंगाबाद-भुसावळ मार्ग
जालना-खामगाव रेल्वे मार्ग पूर्ण व्हावा
औरंगाबादहून मुंबई, अकोला, नागपूर, अहमदाबाद, अजमेर, धनबाद, बंगळूर, गोव्यासाठी रेल्वे सुरू झाली पाहिजे.
सोलापूर-तुळजापूर व्हाया पैठण-औरंगाबाद-जळगाव मार्गाला मंजुरी मिळावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.