औरंगाबाद - बस, रेल्वेतून प्रवास करीत असताना मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होईल, या भीतीपोटी अनेकजण प्रवासात प्लगसॉकेट दिसले की मोबाईल चार्जिंगला लावतात. मात्र, सायबर भामटे ही संधी साधून मोबाईलमधील डाटा हॅक करतात. कधी त्यात व्हायरस सोडून इप्सित साध्य करतात. यासाठी प्रवास करीत असाल आणि आपल्या मोबाईलमधील डाटा सुरक्षित ठेवायचा असेल तर मोबाईलला "यूएसबी कोन्डोम' डिव्हाईस लावणे गरजेचे बनले आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत पैशापेक्षा महत्व आहे ते डेटाला. हा डेटा मिळवण्यासाठी सायबर भामटे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात आणि डेटा हस्तगत करतात. मोबाईलमधील डेटाही या हॅकरमुळे चोरी जाउ शकतो. आज प्रत्येकांच्या हातात मोबाईल फोन आला आहे, मोबाईल फोन ही गरज बनली आहे यामुळे त्याची बॅटरी संपत आली तर मोबाईल वापरणाऱ्यांचा जीव कासावीस होतो.
प्रवासात असला तर बसमध्ये, रेल्वेमध्ये किंवा स्थानकांवर कुठे प्लगसॉकेट दिसले की लगेच मोबाईल चार्जींगला लावण्यासाठी धडपड सुरु होते. ज्यांच्याकडे चार्जर नसेल ते मग कुणालातरी थोड्यावेळासाठी चार्जरची मागणी करतात आणि अशाच ठिकाणी त्यांचा डेटा हॅक होण्याची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांनी सांगीतले.
सार्वजनीक ठिकाणी मोबाईल चार्जींगला लावण्यानंतर त्यावेळी आपला डाटा हॅकर लीक होण्याची शक्यता असते. सायबर क्राईम या विषयात संशोधन केलेले डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले, की यूएसबी कोन्डोम हे फोनशी संबंधित डिव्हाईस आहे. त्याचा वैयक्तिक, सामाजिक जीवनाशी कोणताही संबंध नाही. संबंध आहे तो सायबर क्राईमशी.
क्लिक करा : रुग्ण दगावला..घाटीत नातेवाईकांची तोडफोड
यूएसबी कोन्डोम हे छोटेसे डिव्हाईस मोबाईल डाटाला व मोबाईलला सुरक्षितता प्रदान करते. त्यामुळे त्या डिव्हाईसला "यूएसबी कोन्डोम' म्हणतात. हे डिव्हाईस सार्वजनिक ठिकाणी किंवा जे लोक जास्त प्रवास करतात त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहे. कारण प्रवासात असताना आपण आपला मोबाईल कुठेही यूएसबी केबलच्या साह्याने रिचार्ज करीत असतो; परंतु अनेकदा सायबर गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी असे यूएसबी केबल जाणीवपूर्वक ठेवतात,
त्यामुळे ते केबल आपण प्रवासात आपल्या मोबाईलला लावले, की आपला डाटा चोरीला जातो. आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस सोडले जातात आणि फोन दुरुस्त करून देण्याच्या नावाखाली आपल्याकडून जास्त प्रमाणात पैसे काढण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी यूएसबी कोन्डोम त्यापासून आपल्या फोनचे व डाटाचे संरक्षण करते. हे डिव्हाईस बाजारात 500 रुपयांपासून सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आपला मोबाईल डाटा सुरक्षित राहावा, यासाठी प्रत्येक मोबाईलधारकाने विशेषत: प्रवास करताना यूएसबी कोन्डोम डिव्हाईसचा वापर करावा, असे मत व्यक्त केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.