सर्वसामान्यांच्या मदतीला धावले फादर, १२० कुटुंबीयांना दिला आधार

एकीकडे हाताला काम नाही. त्यातच घरातील कुटूंबियांना कोरोनाच्या महामारीत जगवयाचे कसे हा प्रश्न सर्वसामान्य गोरगरिबांना पडला आहे.
सर्वसामान्यांच्या मदतीला धावले फादर, १२० कुटुंबीयांना दिला आधार
Updated on

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण औद्योगिक वसाहतमधील (Paithan MIDC) सेंट पॉल्स ट्रस्टच्या (Saint Pauls Trust) वतीने गोरगरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या १२० कुटुंबीयांना मोफत महिनाभर‌ पुरेल एवढे अन्नधान्य सेंट पॉल्स मिशन चर्च ट्रस्टचे फादर डॉ.व्हेलेरियन फर्नांडीस (Father Dr.Valerian Fernandes) यांनी दिला आहे. यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे हाताला काम नाही. त्यातच घरातील कुटूंबियांना कोरोनाच्या महामारीत जगवयाचे कसे हा प्रश्न सर्वसामान्य गोरगरिबांना पडला आहे. अशा स्थिती असताता सेंट पॉल्स ट्रस्टच्या वतीने अन्नधान्य मिळाल्याने काही प्रमाणात का होईना महिनाभराचा खान्याचा प्रश्न १२० कुंटूबीयांचा मिटला आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संपूर्ण लाॅकडाऊनच्या (Lock Down) पार्श्वभूमीवर सेंट पॉल्स मिशन ट्रस्ट, पैठण (Paithan) यांच्या सहकार्याने पैठण औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर पोट असलेल्या अनेक बेरोजगारांच्या जीवन मरणाचा संघर्ष सुरू असताना अशा गोरगरीब १०० कुटुंबांना शोधून त्यांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य वितरण करण्यात आले होते. (Aurangabad Latest News Father Dr Valerian Fernandes Give Aid To Poor Families)

सर्वसामान्यांच्या मदतीला धावले फादर, १२० कुटुंबीयांना दिला आधार
चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी, दोघांचाही बुडून मृत्यू

या वर्षी सुध्दा परत एकदा तशीच किंबहुना त्यापेक्षाही अवघड परिस्थिती निर्माण झाली असून हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगार व परिसरातील गोरगरिबांची दैना पाहता सेंट पॉल्स मिशन ट्रस्टचे अध्यक्ष फादर डॉ. व्हेलेरियन फर्नांडिस यांनी मदतीचा हात पुढे केल्याने पैठण तालुक्यातील मुधलवाडी, पिंपळवाडी, पाडोळी, ईसारवाडी, ढोरकीन, गेवराई बार्शी, नारळा, लोहगाव, करंजखेडा, गणेशनगर, राहुलनगर, औद्योगिक वसाहतसह आसपासच्या परिसरातील १२० गरजू कुटूंबातील लोकांना प्रत्येकी 30 किलो अन्नधान्य वितरित केले आहे. या मदतीमुळे गोरगरीब कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी मोठाच हातभार लागणार आहे. त्यामुळे या आनंदी झालेल्या कुटुंबांनी सेंट पॉल्स मिशन चर्च ट्रस्टचे फादर डॉ. व्हेलेरियन फर्नांडिस यांचे आभार मानले असून या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिलिप रक्षे, शामवेल रूपेकर , प्रसाद रणपिसे, सेंट पॉल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर बांगर , पर्यवेक्षक बाळासाहेब थोटे यांनी पुढाकार घेतला आहे.

सध्या कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. तेव्हा दानशूरांनी या परिस्थितीत पुढे येऊन एक समाजाचे घटक होऊन सर्व सामान्य गरीब कुटूंबाची मदत करुन त्यांना मुलभूत गरजा पुरवणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी सेंट पॉल्स मिशन चर्च ट्रस्टच्या वतीने एक महिना भर पुरेल एवढे अन्नधान्य १२० गोरगरीब कुंटुबीयांना वाटप केले आहे.

- फादर डॉ व्हेलेरियन फर्नांडीस, फादर, सेंट पॉल्स चर्च मिशन ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.