औरंगाबाद : कोरोना संसर्ग (Corona Infection) रोखण्यासाठी लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. पण दुसरीकडे लस घेण्यासाठी केंद्रावर आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसींचा तुटवडा (Corona Vaccination Shortage)असल्याने तासन् तास रांगेत उन्हात उभे राहून लस मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. तसेच केंद्रावर पाण्याचे पाणी, खुर्च्या अशा सुविधा नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) आरोग्य केंद्रावर (Health Centre) ॲम्ब्युलन्स उभ्या करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी काढले होते. पण १८ ते २० केंद्रांवर ॲम्ब्युलन्स नाही. त्यामुळे या ठिकणी अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल भाजपतर्फे (BJP) महापालिका प्रशासनाला करण्यात आला आहे. (Aurangabad Latest News Who Are Responsible If Any Misbehave At Corona Vaccination Sites)
लसीकरणासाठी महापालिका प्रशासकडे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक समीर राजूरकर, शिवजी दांडगे, शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन चित्ते, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी प्रशासकांना निवेदन दिले होते. त्यानंतर लसीकरण केंद्रावरील सुविधांवरून याच भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सवाल केला आहे. लसीकरण केंद्रावर आवश्यकतेनुसार खुर्च्या टाकणे, पिण्याचे पाणी, गरज पडल्यास मंडप टाकणे तसेच महापालिकेच्या ३८ आरोग्य केंद्रावर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करावी, असे आदेश प्रशासकांनी काढले आहेत. पण त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. १८ ते २० केंद्रांवर ॲम्ब्युलन्स नाहीत. काही ठिकाणी नागरिकांनी ओरड केल्यानंतर पाणी, खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. पण अद्याप बहुतांश ठिकाणी ही व्यवस्था नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासकांना निवेदनाद्वारे केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.