गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २३ पैकी ८ जागा कॉंग्रेसला मिळाले, तर लोकसभेत आठपैकी ५ जागा लढवण्यात आल्या होत्या. परंतु त्यात यश आले नाही.
औरंगाबाद : सध्या काँग्रेसची Congress Party in Marathwada परिस्थिती पाहता मराठवाड्यातील Marathwada ज्येष्ठ व नवीन नेते मंडळींना सोबत घेऊन परत एकदा पक्षाला पूर्वीचे वैभव मिळवून देणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे Maharashtra Pradesh Congress Committee कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजी मोघे Former Minister Shivaji Moghe यांनी दिली आहे. औरंगाबाद येथे रविवारी (ता.२७) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.मोघे हे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी मोघे यांनी जालना Jalna जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. यानंतर रविवारी ते औरंगाबाद Aurangabad शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष बळकटीसाठी सूचना केल्या. यात महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात पक्षांची परिस्थिती, निवडणुकीच्या वेळेस करावयाची कारवाई या संदर्भात पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आढावा घेतला. पत्रकार परिषदेत श्री.मोघे म्हणाले की, मराठवाड्यातील काँग्रेसची राजकीय परिस्थितीही चांगली आहे. परंतु याही पेक्षा चांगले करण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २३ पैकी ८ जागा कॉंग्रेसला मिळाले, तर लोकसभेत आठपैकी ५ जागा लढवण्यात आल्या होत्या. परंतु त्यात यश आले नाही. तसेच मराठवाड्यातील ४५८ जिल्हा परिषद सदस्यांपैकी ९३ सदस्य काँग्रेसेचे आहेत. त्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसची राजकीय परिस्थिती चांगली आहे. तसेच अशोक चव्हाण, अमित देशमुख असे मराठवाड्यातील चांगले नेते आहेत. अनेक ज्येष्ठ आणि नवीन तरुण नेत्यांना सोबत घेऊन मराठवाड्यात परत परिवर्तन होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार एम. एम. शेख, कल्याण काळे, विलास औताडे, जितेंद्र देहाडे, संतोष भिंगारे आदी उपस्थित होते.aurangabad live news union government does not do work, congress allegation
मोदी, फडणवीस यांच्यावर टोलेबाजी
केंद्र सरकारवर निशाणा साधत मोघे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भाजप पक्षाने कोणते चांगले काम केले असे एक पत्रक जाहीर केले. परंतु या पत्रकात नोटबंदीचा उल्लेखच नाही, तसेच शेतकरी, शेतमजूर, असंघटित, सुशिक्षित बेरोजगारांसाठी दरमहा तीन हजार रुपये देण्यात येत असल्याचा उल्लेख केला आहे. परंतु ही मदत मिळालेले नाही, असे हे जुमलेबाजीचे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मी परत सत्तेवर आल्यानंतर ओबीसीला आरक्षण देईल, नाहीतर राजकारण सोडून देईल. देवेंद्र फडणवीसांच्या Devendra Fadanvis या वक्तव्यावर शिवाजी मोघे म्हणाले, अनेक वेळा फडणवीस म्हणतात की मी परत येईल परंतु त्यांना काही घेणे अन् देणे नाही. मराठा Maratha Reservation व ओबीसी आरक्षण Obc Reservation हे केंद्राच्या हातात आहे. केंद्राने यासाठी कायदा केला तर ते सहज शक्य होईल. तर त्याच्या अंगावर ढकला, त्याच्या अंगावर ढकला, मला परत येऊ द्या अशी श्री.फडणवीस यांनी करू नये. केंद्रात त्यांची सत्ता आहे. दरम्यान २०१४ च्या पहिल्या कॅबिनेटमध्ये फडणवीस यांनी शब्द दिला होता की, आम्ही सत्तेवर आलो तर धनगरांना आदिवासी करून टाकू. परंतु पाचही वर्षे गेले काही वर्षे गेली भाजप धनगरांचे नाव घ्यायला तयार नाही. काँग्रेस चार - दोन कामे करणार नाही परंतु असे खोटे आश्वासन देणार नसल्याचे ते म्हणाले.
आदिवासी बांधवांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार
दरम्यान काँग्रेसच्या काळात आदिवासी समाजाला खावटी अनुदान मिळत असे, परंतु भाजपचे सरकार आले. त्यांनी खावटी अनुदान देण्यास बंदी घातली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्याबरोबर आदिवासी बांधवांसाठी ही योजना परत राबवली. दरम्यान राज्यात बारा लाखांपैकी साडेनऊ लाख आदिवासी बांधवांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले आहेत. तसेच काईन्स (चटणी ,मीठ) राशन किट हेही देण्यात येत आहे. परंतु काय होते थेट पैसे नागरिकांचे खात्यात गेले की नागरिकांना वाटते की मोदीचे पैसे आले. परंतु ते तसे नाही, हा राज्य शासनाचे पैसे आहे असेही श्री.मोघे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.