पैठण (जि.औरंगाबाद) : कोरोना (Corona) आणि लॉकडाउनमुळे (Lock Down) पैठण एमआयडीसीतील (Paithan MIDC) ७० टक्के उद्योग बंद झाले आहेत. परिणामी सुमारे ६ हजार पैकी ४ कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बऱ्याच कामगारांनी विविध वित्तीय संस्था, बचत गट, खासगी बँकाकडून कर्जे घेतलेली आहेत. या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या चिंतेत सद्या कामगार असून आणखी किती दिवस कामासाठी प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न बेरोजगार झालेल्यांसमोर उभा राहिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे १७ एप्रिलपासून १५ मे या कालावधीत इंजिनिअरिंग तसेच ऑक्सिजनवर चालणारे उद्योग बंद (Industry) ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची (Hunger) वेळ आली आहे.(Aurangabad Live Updates 70 Percent Industry Shut Down In Paithan MIDC)
यातील अनेक कामगार भाड्याच्या खोलीत राहत आहेत. एखादा अपवाद वगळला तर सर्वच कामगारांनी विविध वित्तीय संस्था, बचत गट, खासगी बँका, पतसंस्था, सावकार यांच्याकडून कर्जे घेतली आहेत. कर्जाचे हप्ते, व्याज वाढत आहे. घरभाडे, किराणा माल व इतर घरगुती खर्चासाठी कामगारांकडे पैसा नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. पैठण येथे एमआयडीसीची स्थापना १९७६ ला करण्यात आली. जायकवाडी धरणाच्या मुबलक पाणीसाठ्यामुळे या एमआयडीसीचा प्रारंभीच्या काळात झपाट्याने विकास झाला. आज एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रात एकूण १२० विविध उद्योगाचे कारखाने असून यापैकी आज घडीला फक्त ३५ कारखाने सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या एकूण १२० कारखान्यात पाच ते सहा हजार कामगारांची संख्या असून कामगारांच्या कुटुंबातील जवळपास २५ हजार कुटुंबांतील व्यक्तींचे जनजीवन विस्कळित झाले आहे. सद्या या कुटुंबांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली असून केव्हा लॉकडाउन संपते याची हे कुटुंबीय प्रतिक्षा करीत आहे.
कामगारांना मदत करावी
पैठण एमआयडीसीतील कामगार आज वणवण भटकत असून कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे काम मिळत नसल्याचे चित्र एमआयडीसी परिसरात आहे. जे कामगार घरी बसून आहेत, असे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी शासन, दानशूर, सेवाभावी संस्थांनी आर्थिक अथवा संसारोपयोगी साहित्य देऊन मदत करावी, अशी मागणी या कामगारांतून होत आहे.
पहिल्यांदाच बेरोजगारीचे मोठे संकट!
पैठण एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर अनेक कारखान्यात छोटे मोठे वाद कामगार आणि कारखानदारात झाले. परंतु हे वाद मिटले व कारखानदारी सुरु राहिली. त्यामुळे एमआयडीसीमध्ये आज समृद्धी दिसत आहे. परंतु एमआयडीसीच्या इतिहासात कोरोनामुळे पहिल्यांदाच बेरोजगारीचे हे मोठे संकट उभे ठाकल्याने कामगार संकटात सापडले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.