रुग्णाचा मृतदेह देण्यास डॉक्टरचा नकार, नातेवाईकांची पोलिसांकडे धाव

बजाजनगर (जि.औरंगाबाद) : घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
बजाजनगर (जि.औरंगाबाद) : घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
Updated on
Summary

आमचा रुग्ण सकाळी९.३० वाजेच्या सुमारास दगावला. मात्र त्यानंतरही आम्हाला डॉक्टरने चिठ्ठी लिहून दिली. आणि औषधी आणण्यास सांगितले.

वाळूज (जि.औरंगाबाद) : गेल्या एकवीस दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाचा (Corona) उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र बिलाचे पैसे दिल्याशिवाय मृतदेह देणार नसल्याचे डॉक्टरने सांगितल्याने मृताच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार सोमवारी (ता.२४) रोजी बजाजनगर येथे घडला. सिडको वाळूज महानगर (Cidco Waluj Mahanagar) येथील ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना बजाजनगर (Aurangabad) येथील ममता मेमोरियल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Mamta Memorial MultiSpeciality Hosptil, Bajajnagar) ता.13 मे रोजी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या रुग्णाचा स्कोर २१ होता. त्यामुळे त्याला व्हेंटीलेटरवर (Ventilator) उपचार करावे लागले. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी (ता.२४) रोजी मृत्यू झाला. (Aurangabad Live Updates Without Payment Not Hand Over Patient Dead Body In Bajajnagar)

बजाजनगर (जि.औरंगाबाद) : घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
उद्धव ठाकरे, मोदींनी टिव्हीवर येताना गरिबांचाही विचार करावा: इम्तियाज जलील

उपचारादरम्यान दवाखान्याचे बिल दोन लाख १९ हजार ३०० रुपये झाले. त्यातील दोन राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने ४० हजार रुपये कमी करण्यात आले. मात्र राहिलेले ८० हजार रुपये दिल्याशिवाय रुग्णाचा मृतदेह देणार नसल्याचा आरोप करत रूग्णाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या (Waluj MIDC Police) उपनिरीक्षक प्रिती फड, पोलिस हेडकाँस्टेबल रामदास गाडेकर, एस.डी.आधाने आदींनी दवाखान्यात धाव घेत डॉक्टर व नातेवाइकांशी चर्चा केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या समोर पंचशील या संस्थेच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला.

रुग्ण दगावल्यानंतरही सांगितले औषध

आमचा रुग्ण सकाळी९.३० वाजेच्या सुमारास दगावला. मात्र त्यानंतरही आम्हाला डॉक्टरने चिठ्ठी लिहून दिली. आणि औषधी आणण्यास सांगितले. दवाखाना व औषधी मिळून पाच लाख रुपये लागले. तरीही रुग्ण दगावला, असा आरोप नातेवाईकांनी केला.

पैशासाठी मृतदेह अडवला नाही

याबाबत हॉस्पिटलचे डॉ. सुदाम चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, रुग्णाची परिस्थिती क्रिटिकल होती. २१ स्कोर असल्यामुळे व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात आले. शासकीय नियमाप्रमाणे २१ दिवसाचे बिल देण्यात आले. त्यातील एक लाख रुपये अगोदर दिलेले होते. तर 80 हजार रुपये भरा. असे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र पैश्यासाठी रुग्णाचा मृतदेह अडवून धरला. हे साफ चुकीचे आहे, असे डॉ. चव्हाण म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()