औरंगाबाद : शंभर कोटींच्या रस्त्यांना मिळेना कंत्राटदार!

महापालिकेवर फेरनिविदा काढण्याची वेळ
Aurangabad muncipal corporation
Aurangabad muncipal corporationsakal
Updated on

औरंगाबाद - महापालिकेच्या निधीतून शंभर कोटी रुपयांची रस्ते कामे करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. पण या एका निविदेला एक तर दुसऱ्या निविदेला एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांची कामे काही वर्षात करण्यात आली. त्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. पण अतंर्गत रस्त्यांचे अद्याप हाल सुरूच आहेत. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’तून ३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांची कामे केली जात आहेत. त्यासोबतच महापालिकेने देखील रस्त्यांची कामे करण्यासाठी बजेटमध्ये २०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५० कोटीच्या ८१ रस्त्यांच्या दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. पॅकेज क्रमांक एक व पॅकेज दोन अशी विभागणी करण्यात आली आहे.

निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख दोन जुलै होती. मात्र निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळाला नाही. पॅकेज एकमधील रस्त्यांच्या कामासाठी एकही निविदा आली नाही तर पॅकेज दोनच्या कामासाठी केवळ एक निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या निविदेबद्दल माजी पदाधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत. त्यात कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने प्रशासन बॅकफूटवर गेले आहे. त्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

नियम काय सांगतो?

नियमानुसार पहिल्यांदा किमान तीन निविदा सादर होणे गरजेचे आहे. दुसऱ्यावेळेस दोन तर तिसऱ्या वेळेस एक निविदा आली तरी ती अंतिम करता येते. या केसमध्ये एका निविदेला एक तर दुसऱ्या निविदेला प्रतिसादच मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.