Home : औरंगाबाद - घरांचा फुगा फुटला!

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरातील ४३ हजार ८५३ बेघर नागरिकांनी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात महापालिकेमार्फत सुमारे १५ हजार घरे बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
pradhan mantri awas yojana
pradhan mantri awas yojana esakal
Updated on
Summary

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरातील ४३ हजार ८५३ बेघर नागरिकांनी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात महापालिकेमार्फत सुमारे १५ हजार घरे बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद - प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरातील ४३ हजार ८५३ बेघर नागरिकांनी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात महापालिकेमार्फत सुमारे १५ हजार घरे बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने घरकूल योजनेसाठी दिलेल्या १२८ हेक्टर जागेपैकी राज्य शासनाने हर्सूल व चिकलठाणा येथील जागा वगळली आहे. त्यामुळे ३६ हेक्टर जागेत घरे बांधली जाणार असल्याचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी (ता. १०) सांगितले.

पत्रकारांसोबत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, की जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तीसगाव, पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा व सुंदरवाडी या पाच ठिकाणच्या जागा दिल्या होत्या. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२८ हेक्टर एवढे होते. तिथे सुमारे ४० हजार घरांचा डीपीआर मंजूर आहे. पण तीसगाव येथील जागेत खदान व डोंगर आहे. अन्य तीन ठिकाणच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत.

त्यामुळे गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या चौकशीनंतर हर्सूल व चिकलठाणा येथील जागांवरील प्रकल्प रद्द करण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार आता तीसगाव, सुंदरवाडी व पडेगाव येथील जागेवरच योजना राबविण्यात येईल. ही जागा ३६ हेक्टर एवढी आहे. ३०० चौरस फुटांची घरे असतील. साधारणपणे १५ हजार घरकुल तयार होतील. तीसगाव आणि सुंदरवाडी या दोन ठिकाणी घरकुलासाठी ३१ मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

४३ हजार अर्जांची छाननी

महापालिकेने नव्याने अर्ज मागविले आहेत. त्यात ४३ हजार ८५३ बेघरांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या या अर्जांची छाननी केली जात असून, त्यात काही अर्ज बाद होतील. तसेच घरांचे दर साइट निश्‍चित झाल्यानंतर किती जण घरे घेण्यास तयार होतात. किती जणांचे बॅंकेत कर्ज प्रकरण होऊ शकते? या बाबींचा विचार करून यादी अंतिम केली जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

पडेगावला दर तब्बल ४० हजारांचा

पडेगाव येथील जागेवर घरे बांधण्यासाठी समरथ कन्स्ट्रक्शनची निविदा अंतिम झाली असून, या एजन्सीने बँक गॅरंटीही भरली आहे. पण बांधकामाचा दर ४० हजार ६०८ चौरस मिटर एवढा असल्याने हे दर कमी करण्यासाठी कंत्राटदारासोबत वाटाघाटी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. येथील एका घराचा दर १२ लाख १७ हजार रुपये आहे.

साधारणपणे हा दर कमी करण्यासाठी समरथ कन्स्ट्रक्शनला बैठकीसाठी बोलविले जाणार आहे. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत या भागात काय दर सुरू आहेत, याची देखील माहिती घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.