औरंगाबाद महापालिकेची १५ लॅबला नोटीस

ॲन्टीजेन, आरटीपीसीआर चाचण्या करण्यास टाळाटाळ
corona virus
corona virus sakal
Updated on

औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग(Corona virus) झपाट्याने वाढत आहे. असे असताना ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR test) करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ लॅबला महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी शुक्रवारी (ता. १४) सांगितले.

corona virus
पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

कोरोना संसर्गाच्या काळात राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क केल्या आहेत. कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या झाल्या पाहिजे, यासाठी लॅबची संख्या वाढविली जात आहे. त्यासाठी दर देखील निश्‍चित करण्यात आले आहेत. महापालिकेकडून शहरातील ३९ खासगी प्रयोग शाळा (लॅब) चालकांनी ॲन्टीजेन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी परवानगी घेतली. त्यासाठी रुग्ण स्वत:हून लॅबमध्ये तपासणीसाठी आल्यास १०० रुपये, तपासणी केंद्रावरून नमुने घेतल्यास १५० रुपये, रुग्णांच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास २५० रुपये या प्रमाणे शुल्क ठरविण्यात आले आहेत. मात्र, परवानगी घेतल्यानंतरही खासगी लॅब चालकाकडून कोरोनाच्या ॲन्टीजने, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. ३९ पैकी २४ लॅबमध्ये चाचण्या होत आहेत. पण उर्वरित १५ चालकांनी अद्याप एकाही चाचणी केलेली नाही. त्यामुळे या लॅबचालकांना परवानगी रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

corona virus
सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्राचा भारताला इशारा

या १५ लॅबचा आहे समावेश

एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिल्ट्री हॉस्पिटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदिरजवळ, गणेश लॅबोरेटरी सर्विसेस पुंडलीकनगर, ओरीयन सिटी केअर हॉस्पिटल गुरुगोविंदसिंगपूरा, अमृत पॅथालॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम लाडली हॉटेलजवळ, युनिसेफ पॅथॉलॉजी लॅब, भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-२ आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.