औरंगाबाद - शहरामध्ये लॉकडाऊन असतानाही अशा परिस्थितीत नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या ४४३ वाहनांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत; तर चार गुन्हे सिटी चौक व वाहतूक शाखेकडून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे. त्याअनुषंगाने औरंगाबाद शहर पोलिस दलातर्फे शहरांत जागोजागी चौकाचौकांत, गल्लीबोळांत नाकाबंदी पॉइंट व पेट्रोलिंग लावण्यात आली आहे.
पोलिसांनी सर्व धर्मगुरूंना सर्व धार्मिक स्थळांवरील जबाबदारांना आवाहन केले आहे. त्यात पूजाअर्चा, नमाज अदा करणे हे फक्त धार्मिक स्थळावरील लोकांनीच करावे. नागरिकांनी पूजाअर्चा आणि इतर गोष्टी घरीच कराव्यात.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
पोलिसांनी केलेले आवाहन
होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांनी लोकांपासून संपर्क टाळायला हवा. त्यांनी घरीच थांबावे. विनाकारण शहरात किंवा घराबाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.
सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा
लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९६ आपत्ती प्रतिबंध अधिनियम २००५ व भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.